Jump to content

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली

लर्निंग मॅनेज्मेंट सिस्टम, एल.एम.एस, (शिक्षण व्यवस्थापन प्रणाली) हे एक सॉफ्टवेर अप्लिकेशन आहे. ह्या सॉफ्टवेरचा वापर ईलेक्ट्रॉनिक शैक्षणिक तंत्रज्ञानात प्रशासन, दस्तावेज, अहवाल, वितरण किंवा ई-लर्निंग साठी केल्या जातो[]. ही प्रणाली प्रशिक्षण व्यवस्थापन ते महाविध्यालयीन अभ्यासक्रमच्या ऑनलाइन वितरणात विशेषकरून उपयोगी आहे. ह्या प्रणालीत इंटरनेट द्वारे ऑनलाइन कोलॅबोरेशन (सहकार्य) शक्य आहे. विध्यापीठ, महाविध्यालय, शाळा, ह्या एल. एम. एस. प्रणालीचा वापर ऑनलाइन कोर्सस व ओन्-कँपस कोर्सस साठी करत आहे. आम भाषेत ह्या प्रणालीला 'मूडल' असे म्हटल्या जाते. ह्या प्रणाली मुळे शाळेत शिकवलेल्या अभ्यासाला अधिक गति येते.

वैशिष्ठेय

ईतिहास

संगणकाचा शिक्षण क्षेत्रात वापराच्या ईतिहासात सर्वसामान्यतः संगणक आधारित सूचना (कंप्यूटर बेस्ड इन्स्ट्रक्षन), संगणक सहाय्य सूचना (कंप्यूटर असिस्टेड इन्स्ट्रक्षन), संगणक सहाय्य शिक्षण (कंप्यूटर अससिटेड लर्निंग) ह्या शब्दावल्या आढळतात. संगणक आधारित सूचनांचा वापर सरावासाठी, संगणक सहाय्य सूचना शिकवणीला अधिक प्रभावी बनवण्यासाठी व संगणक सहाय्य शिक्षण वैयक्तिक सूचनांसाठी वापरल्या जातात[]. शिक्षण व्यवस्थापन प्रणालीत प्रामुकख्याने वापरली जाणारी आणखी एक प्रणाली आहे - एकिकृत शिक्षण प्रणाली (इंटेग्रेटेड लर्निंग सिस्टम), जी अतिरिक्त कार्यशीलतेमुळे अधिक प्रभावी आहे. 'शिक्षण व्यवस्थापन प्रणाली' किंवा एल. एम. एस. हे नाव सर्वप्रथम जोस्टेन्स लर्निंग ह्यांनी वापरले. हे नाव मूलतः प्लेटो के-१२ शिक्षण प्रणालीच्या व्यवस्थापन क्षेत्राच्या उल्लेखा साठी होते, आणि ह्यात पाठ्यक्रम सामील नव्हता. आजकाल 'शिक्षण व्यवस्थापन प्रणाली' हे शिक्षण क्षेत्रातल्या अनेक विविध संगणक अनुप्रयोगांचे वर्णन करते[].

उद्देश

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली किंवा एल. एम. एस. द्वारे शिक्षण क्षेत्रातील सर्व पैलू पद्धतशीर पणे हाताळले जातात. शिक्षण व्यवस्थापन प्रणाली ही एक पायाभूत सुविधा आहे जी शिकवण्याच्या सामग्रीचे व्यवस्थापन व वितरण, वैयक्तिक आणि संस्थात्मक प्रशिक्षण ध्येयान्चे मूल्यांकन, ध्येय पुरतीचा आढावा घेते आणि संपूर्ण संस्थेच्या शिक्षण प्रक्रियेच्या देखरेखे साठी माहिती गोळा करून प्रस्तुत करते[]. अभ्यासक्रमासाठी नोंदणी, प्रशासन, कौशल्याचे विश्लेषण ईत्यादि साठी ह्या प्रणालीचा उपयोग केल्या जातो[].

पाठ्यक्रम व प्रशासनिक कार्यांमधे सुलभतेसाठी बहुतांश शिक्षण व्यवस्थापन प्रणाली वेब-आधारित आहेत. शैक्षणिक संस्था ह्या प्रणालीचा प्रयोग शालेय शिक्षणास आधार देण्यास व अभ्यासक्रमास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास करतात. विद्यार्थी स्व-नोंदणी, प्रशिक्षण कार्यपद्धत, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन मूल्यांकन, सहयोगी शिक्षण, प्रशिक्षण संसाधन व्यवस्थापन हे सर्वे ह्या प्रणालीचे महत्त्वाचे घटक आहेत.

काही शिक्षण व्यवस्थापन प्रणालीत 'कामगार व्यवस्थापन प्रणाली'चे समावेश आहे व ह्यामधे कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन, पूरक व्यवस्थापन, कौशल्य-अंतर विश्लेषण, परंपरा नियोजन, ३६०डिग्री मूल्यांकन केल्या जाते.

व्यावसायिक क्षेत्रात शिक्षण आणि कामगिरी व्यवस्थापन प्रणालीत भरती व कार्यक्षम लोकांना प्रोत्साहन देतात.

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली व अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रणाली

शिक्षण व्यवस्थापन प्रणाली व शैक्षणिक सामग्री व्यवस्थापन प्रणाली

सर्व-व्यापी एल.एम.एस

तांत्रिक पैलू

शिक्षण व्यवस्थापन उद्योग

एल. एम. एस.ची नवीन पिढी

  1. ^ Ellis, Ryann K. (2009), Field Guide to Learning Management Systems, ASTD Learning Circuits
  2. ^ Parr, J.M.; Fung, I (September 28, 2004). exid=6920&indexparentid=1024 "A Review of the Literature on Computer-Assisted Learning, particularly Integrated Learning Systems, and Outcomes with Respect to Literacy and Numeracy.". New Zealand Ministry of Education. Retrieved April 2, 2005.
  3. ^ Watson, William R. (2007). "An Argument for Clarity: What are Learning Management Systems, What are They Not, and What Should They Become?" (PDF). TechTrends 51 (2): 28–34. Retrieved 13 February 2013.
  4. ^ Szabo, Micheal; Flesher, K. (2002). "CMI Theory and Practice: Historical Roots of Learning Management Systems". Proceedings of World Conference on E-Learning in Corporate, Government, Healthcare, and Higher Education 2002 (White Paper) (Montreal, Canada: In M. Driscoll & T. Reeves (Eds.)): pp. 929–936. ISBN 1-880094-46-0.
  5. ^ Gilhooly, Kym (16 July 2001). "Making e-learning effective". Computerworld 35 (29): 52–53.