Jump to content

शिकागो

शिकागो
Chicago
अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर


ध्वज
चिन्ह
शिकागो is located in इलिनॉय
शिकागो
शिकागो
शिकागोचे इलिनॉयमधील स्थान
शिकागो is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
शिकागो
शिकागो
शिकागोचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°52′55″N 87°37′40″W / 41.88194°N 87.62778°W / 41.88194; -87.62778

देशFlag of the United States अमेरिका
राज्य इलिनॉय
स्थापना वर्ष इ.स. १८३७
महापौर राह्म इमॅन्युएल
क्षेत्रफळ ६०६.२ चौ. किमी (२३४.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५८६ फूट (१७९ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २६,९५,५९८
  - घनता ४,४४७ /चौ. किमी (११,५२० /चौ. मैल)
  - महानगर ९४,६१,१०५
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
cityofchicago.org


शिकागो अमेरिकेच्या इलिनॉय राज्यामधील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लेक मिशिगनच्या किनारी वसलेल्या या शहराची वस्ती सुमारे २७ लाख आहे. शिकागो महानगराची वस्ती अंदाजे ९७,००,००० असून ही लोकसंख्या इलिनॉय, विस्कॉन्सिनइंडियाना राज्यांमध्ये पसरलेली आहे.

इ.स. १८३३ साली ग्रेट लेक्समिसिसिपी नदी ह्यांना जोडणाऱ्या एका नैसर्गिक कालव्याजवळ शिकागोची स्थापना झाली. स्वामी विवेकानंदांनी इ.स. १८९३ साली ह्याच शहरात दिलेल्या एका भाषणाच्या सुरुवातीस श्रोत्यांना "Brothers and Sisters of America....." असे उल्लेखून सगळ्या जगाची वाहवा मिळवली आणि हिंदू धर्म आणि प्रथा याची जगाला काही प्रमाणात ओळख करून दिली.[]

सध्या शिकागो अमेरिकेच्या मिडवेस्ट भागातील मोठे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे. शिकागोला जगातील सर्वात महत्त्वाच्या १० आर्थिक केंद्रांपैकी एक मानले जाते. ह्या शहराला अमेरिकेचे दुसरे शहर (सेकंड सिटी) म्हणूनही ओळखतात. येथील ओ'हेर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वर्दळीचा विमानतळ आहे. सध्याच्या घडीला अमेरिकेमधील सर्वात उंच इमारत विलिस टॉवर ह्याच शहरात स्थित आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा शिकागोचे रहिवासी आहेत.

इतिहास

अनेक वर्षे Red Indian लोकांशी युद्ध केल्यानंतर इस १८३३ मध्ये शिकागो शहराची मांडणी झाली. शिकागो शहराची हळूहळू वाढ होत असताना रविवार, ८ ऑक्टोबर १८७१ रोजी रात्री ९ वाजता या शहरात आग लागली. असे म्हणतात, एका गाईची कंदिलाला धक्का लागून ही आग लागली पण ते खरा असेलच असे नाही. शिकागो शहरात लाकडी बिल्डिंग खूप जास्त असल्याने ही आग भराभर पेटत गेली. त्यात प्रचंड जोरात वाहणारे वारे यांनी तर ती फारच भडकली. रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी अग्निशामक विभागाला याची माहिती मिळाली पण दुर्दैव असा की त्यांनी आग विझवायला बंब पाठवले ते उलट दिशेला. तोवर आगीने असे काही रुद्र रूप धारण केले की सारे हतबल झाले. शिकागोच्या मेयर ने आजूबाजूच्या परिसरातून मदत मागितली पण आगीचे प्रमाण एवढे मोठे होते की कशा कशाचा उपयोग झाला नाही शिकागो शहराची पाणी पुरवठा विभागाची बिल्डिंग जाळून गेली आणि शहराला आग विझवायला पाणी मिळायची शक्यताही अंदुक अंधुक होत गेली. हॉटेल्स, मोठ्ठी दुकाने, वाडे, सिटी हौल, झाडे, चर्चेस, बिल्डींग्स सगळे जाळून गेले. शेवटी सोमवारी रात्री पडलेल्या पावसाने आणि वाऱ्याच्या बदललेल्या दिशेने आग आटोक्यात आली आणि ३५ टक्के शहर जाळून गेल्यावर ३ दिवसांनी मंगळवारी सकाळी ही आग विझली! जवळ जवळ २००० एकर परिसर जळून बेचिराख झाला होता. तीन लाखांपैकी एक लाख लोक यात बेघर झाले. २० ते ३० लाख पुस्तके तेथील ग्रंथालयातील जळून गेली.या घटनेला Great Chicago Fire of 1871 असे म्हणतात.

या धक्यातून शिकागो शहर मात्र लवकर सावरले. संपूर्ण देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. देश विदेशातून लोक आले आणि त्यांनी शिकागो शहर नव्याने उभे केले. लाकडाचा वापर जास्त केल्याने जळलेल्या शहराने मग स्टीलचा वापर केलेल्या बिल्डिंग बांधायला सुरुवात केली. शिकागोतील प्रत्येक बिल्डिंगला एक इतिहास आहे.

भूगोल

शिकागो शहर इलिनॉयच्या ईशान्य भागात लेक मिशिगनच्या काठावरील ९९७ वर्ग किमी एवढ्या क्षेत्रफळाच्या भागावर वसले आहे.

हवामान

येथील इतर शहरांप्रमाणे शिकागोचे हवामान उन्हाळ्यात सौम्य तर हिवाळ्यात अतिथंड व रूक्ष असते.

शिकागो मिडवे विमानतळ साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °फॅ (°से) 67
(19)
75
(24)
86
(30)
92
(33)
102
(39)
107
(42)
109
(43)
102
(39)
101
(38)
94
(34)
81
(27)
72
(22)
109
(43)
सरासरी कमाल °फॅ (°से) 31.5
(−0.3)
35.8
(2.1)
46.8
(8.2)
59.2
(15.1)
70.2
(21.2)
79.9
(26.6)
84.2
(29)
82.1
(27.8)
75.3
(24.1)
62.8
(17.1)
48.6
(9.2)
35.3
(1.8)
59.4
(15.2)
दैनंदिन °फॅ (°से) 24.8
(−4)
28.7
(−1.8)
38.8
(3.8)
50.4
(10.2)
60.9
(16.1)
71.0
(21.7)
75.9
(24.4)
74.1
(23.4)
66.4
(19.1)
54.2
(12.3)
41.5
(5.3)
29.0
(−1.7)
51.3
(10.7)
सरासरी किमान °फॅ (°से) 18.2
(−7.7)
21.7
(−5.7)
30.9
(−0.6)
41.7
(5.4)
51.6
(10.9)
62.1
(16.7)
67.5
(19.7)
66.2
(19)
57.5
(14.2)
45.7
(7.6)
34.5
(1.4)
22.7
(−5.2)
43.5
(6.4)
विक्रमी किमान °फॅ (°से) −25
(−32)
−20
(−29)
−7
(−22)
10
(−12)
28
(−2)
35
(2)
46
(8)
43
(6)
34
(1)
20
(−7)
−3
(−19)
−20
(−29)
−25
(−32)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 2.06
(52.3)
1.94
(49.3)
2.72
(69.1)
3.64
(92.5)
4.13
(104.9)
4.06
(103.1)
4.01
(101.9)
3.99
(101.3)
3.31
(84.1)
3.24
(82.3)
3.42
(86.9)
2.57
(65.3)
39.09
(992.9)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 11.5
(29.2)
9.1
(23.1)
5.4
(13.7)
1.0
(2.5)
trace 0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.1
(0.3)
1.3
(3.3)
8.7
(22.1)
37.1
(94.2)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)10.7 8.8 11.2 11.1 11.4 10.3 9.9 9.0 8.2 10.2 11.2 11.1 123.1
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)8.1 5.5 3.8 0.7 0 0 0 0 0 0.1 1.8 6.7 26.7
स्रोत #1: Illinois State Climatologist Office (normals 1971−2000, extremes 1928−2006) []
स्रोत #2: HKO (sun only, 1961−1990) []

खेळ

खालील पाच प्रमुख व्यावसायिक संघ शिकागो महानगरामध्ये स्थित आहेत. अमेरिकेमधील चारही मोठ्या खेळांमधील व्यावसायिक संघ असलेले शिकागो हे १२ पैकी एक शहर आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
शिकागो बेअर्सअमेरिकन फुटबॉलनॅशनल फुटबॉल लीगसोल्जर्ज फील्ड १९१९
शिकागो बुल्सबास्केटबॉलनॅशनल बास्केटबॉल असोसिएशनयुनायटेड सेंटर १९६६
शिकागो ब्लॅकहॉक्स आइस हॉकीनॅशनल हॉकी लीगयुनायटेड सेंटर १९२६
शिकागो कब्ज बेसबॉलमेजर लीग बेसबॉलरिग्ली फील्ड १८७०
शिकागो व्हाईट सॉक्स बेसबॉलमेजर लीग बेसबॉलयू.एस. सेल्युलर फील्ड १९००

शहर रचना

लेक मिशिगनमधून घेतलेले शिकागोचे चित्र
शिकागो शहर रात्रीच्या वेळी

प्रेक्षणीय स्थळे

मिलेनियम पार्क हे शहरातील एक मोठे उद्यान आहे. याच्या बाजूलाच एक 'सिटी पार्क' पण आहे. येथे एक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचे ठिकाण आहे. २००५ साली वालाच्याच्या आकाराची ही वस्तू स्टीलची बनवलेली असून सर्व बाजूंनी पॉलिश करून चकाचक दिसते. दर वर्षी अंदाजे ५ कोटी पर्यटक शिकागोला भेट देतात

इतर

इ.स. २०११चे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे संमेलन शिकागो येथे भरले.

जुळी शहरे

जगातील खालील शहरे शिकागोची जुळी शहरे आहेत.

संदर्भ

  1. ^ P. R. Bhuyan, Swami Vivekananda, p. 17
  2. ^ "Historical Climate Data Chicago Midway Airport (1971-2000)". Illinois State Climatologist Office. 2009-11-10 रोजी पाहिले.
  3. ^ "Climatological Normals of Chicago". Hong Kong Observatory. 2010-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-05-12 रोजी पाहिले.

बाह्य दुवे