शिंजरा तिसा (पक्षी)
शिंजरा तिसा (इंग्लिश: White eyed buzzard; हिंदी: तीसा, श्वेतनेत्र गरुड; संस्कृत: द्रोनक, पुण्डरीकाक्ष, पुण्डरीकाक्ष सरटसुपर्ण; गुजराती: टीसो; तेलुगू: बोडूमली गड्ड) हा एक पक्षी आहे.
ओळख
हा पक्षी आकाराने डोमकावळ्याएवढा असून याला करडा उंदी बाज, पांढरा कंठ असतो. गालावर काळे पट्टे. खालून बदामी व पांढराशुभ्र. चोचीच्या मुळाशी नारिंगी-पिवळा रंग. डोळा पांढरा. जवळून ठळक दिसतो. माथ्यावर ठळक डाग. खांदे बदामी रंगाचे. यांमुळे या पक्ष्याशी ओळख पटते. नर-मादी दिसायला सारखे.
हे पक्षी भारतातील रुक्ष, उजाड प्रदेशात सापडता.
फेब्रुवारी ते मे या काळात यांची वीण होते.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली