शिंगवे
?शिंगवे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | शिर्डी |
विभाग | नाशिक |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री | ४,२५८ (२०११) १.०६ ♂/♀ ६७.५४ % • ७४.३३ % • ६०.३१ % |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | शिर्डी लोकसभा |
विधानसभा मतदारसंघ | कोपरगाव विधानसभा |
ग्रामपंचायत | स्थापना - १९५२ सदस्य - ११ |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 413708 • +०२४२३ • MH-१७ (श्रीरामपूर) |
संकेतस्थळ: शिंगवे ग्रामपंचायत |
शिंगवे हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील असून, तालुक्यातील क्षेत्रफळाने मोठया असलेल्या गावांपैकी एक आहे.
स्थान
शिंगवे गाव अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस गोदावरी नदीकाठी वसलेले आहे.
पुणतांबा, पिंपळवाडी, सडे, रुई आणि वारी ही जवळील गावे आहेत. शिर्डी, राहाता व कोपरगाव ही नजीकची शहरे आहेत.
लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ४२५८ आहे. त्यापैकी २१९४ पुरुष व २०६४ स्त्रिया आहेत.
अर्थव्यवस्था
शेती हा येथील मुख्य व्यवसाय असुन बहुतेक लोक शेती व दुग्ध व्यवसाय करतात. खालील तक्ता गावात घेतल्या जाणाऱ्या पिकांसंबंधी आहे.
प्रकार | पिके |
---|---|
खरीप | बाजरी,मका, सोयाबीन |
रब्बी | गहू, हरभरा |
नगदी | ऊस, कांदा |
शिक्षण
शिंगवे गावात जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक शाळा व एक माध्यमिक विदयालय आहे.
- प्राथमिक शाळा
- जि. प. शाळा (मध्यवर्ती)
- जि. प. शाळा (पश्चिम)
- जि. प. शाळा (पुर्व)
- माध्यमिक विदयालय
- शृंगेश्वर माध्यमिक विदयालय
परिवहन
रस्ते
शिंगवे गाव कोपरगाव व श्रीरामपूर या शहरांना राज्य मार्गने (रा.मा. ३६) जोडलेले आहे. इतर ग्रामीण रस्ते पिंपळवाडी, शिर्डी, रुई आणि वारी यांना जोडतात.
रेल्वे
साईनगर शिर्डी, पुणतांबा आणि कान्हेगाव हे जवळील रेल्वे स्थानक आहेत.
हवाई
शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गावापासून २५ किमी अंतरावर स्थित विमानतळ आहे.