शिंक
फुफ्फुसातील हवा स्फोटागत आवाजासह तोंड व नाकाद्वारे बाहेर फेकली जाण्याच्या क्रियेस शिंक असे म्हणतात. तपकिरीची, मिरचीची किंवा अन्य पदार्थाची भुकटी, थंड पाणी किंवा थंड हवा यांच्यादिकांच्या नाकाला झालेल्या स्पर्शामुळे वा अन्य कारणांमुळे नाकाचा पडदा(म्यूकस मेंब्रेन) उद्दीपित होतो. त्याशिवाय सर्दीमुळे किंवा जंतुसंसर्गामुळे असे होऊ शकते. अशा वेळी शिंक येते. शिंकेच्या क्रियेमुळे हा जंतुसंसर्ग किंवा सर्दी बाहेर फेकली जाते. शिंक ही मानवी शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तिचा वेग 130 किलोमीटर प्रति तास असतो.