Jump to content

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार

शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना दिला जातो. हा पुरस्कार सन २००५-२००६ पासून सुरू करण्यात आला असून त्याचे वितरण सामाजिक न्यायदिनी केले जाते. सामाजिक न्यायासाठी अखंडपणे लढणाऱ्या महात्मा जोतीराव फुले, छ. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महापुरुषांचे नाव या पुरस्काराला दिलेले आहे.

योजनेच्या प्रमुख अटी

  • समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी नोंदणीकृत संस्था असावी.
  • सामाजिक सेवेचा कालावधी १५ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल असावा.

लाभाचे स्वरूप

एकूण ६ विभागातील प्रत्येकी एक प्रमाणे ६ संस्थांना प्रत्येकी रु. १५ लाख प्रमाणे पारितोषिकाची रक्कम देण्यात येते. स्मृतीचिन्ह, चांदीचा स्क्रोल, सन्मानपत्र

योजनेची वर्गवारी

सामाजिक सुधारणा क्षेत्रासाठी हा पुरस्कार दिला जातो. सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)

वर्ष,खर्च व लाभार्थी

१.२०१३-१४

  • ९० लाख
  • ६ संस्था

२.२०१४-१५

  • ९० लाख
  • ६ संस्था

[]

योजनेचा शासन निर्णय

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-२००९/प्र.क्र.२३/बांधकामे, दिनांक ३१ ऑगस्ट, २०१२

अर्ज करण्याची पद्धत

वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातात.

हे सुद्धा पहा

संदर्भ