Jump to content

शास्त्रीय परिभाषा कोश

ग्रंथपरिचय

य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. १९४८. शास्त्रीय परिभाषा कोश - एक वरदान

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी , वैद्यकीय या विज्ञानाधारित विषयांसोबत आता शेकडो अन्या विज्ञानाधारित विषय अस्तित्वात आले आहेत. उदा० संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान इ. या विविध विषयांतील विषयलक्षी शब्दांना त्या त्या विषयातील पारिभाषिक शब्द म्हणतात. इंग्रजीत लाखो शास्त्रीय पारिभाषिक शब्द आहेत आणि यातील बहुसंख्य शब्दांना मराठी प्रतिशब्दच नाहीत अशी महाराष्ट्रातील अनेक शिक्षित, सुशिक्षितांची प्रामाणिक समजूत आहे.

य.रा. दाते, चिं. ग. कर्वे. संपादित १९४८मध्ये प्रसिद्ध झालेला शास्त्रीय परिभाषा कोश हा कोश या समजुतीला छेद देणारा आहे. महाराष्ट्रातील उच्चशिक्षितानाही असंख्य इंग्रजी शास्त्रीय पारिभाषिक शब्दांचे मराठी प्रतिशब्द माहित नाहीत. ते शब्द माहीत नाहीत, इतकेच नाही, तर असंख्य इंग्रजी पारिभाषिक शब्दांना १९४८ किंवा त्यापूर्वीच मराठी प्रतिशब्द देण्याचे महान कार्य कोणीतरी करून ठेवले आहे याचीही गंधवार्ता अनेक शिक्षित, उच्चशिक्षितांना नाही. गेल्या सत्तर वर्षात हे मराठी पारिभाषिक शब्द वापरण्याचा प्रयोग झाला नाही, म्हणून हा मौल्यवान खजिना लपून राहिला होता. आता वरदा प्रकाशनाने कोशाची नवीन आवृत्ती काढली आहे.