शामोनि
शामोनि तथा शामोनि-माँट-ब्लांक हे फ्रांसच्या ऱ्होन-आल्प्स प्रदेशाच्या हाउत-साव्वा प्रांतात असलेले छोटे गाव आहे. हे गाव पहिल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ९,८०० लोकसंख्या असलेल्या या गावात एकाचवेळी ६०,००० पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते.
हे शहर युरोपमधील सर्वोच्च शिखर माँट ब्लांकच्या पायथ्याशी वसलेले असून ऐग्विल दु मिडी हे दुसरे मोठे पर्वतशिखर येथून जवळ आहे. येथे स्कीईंग व इतर हिवाळी खेळांसाठीची सोय आहे.