Jump to content

शांतीवन

शांतीवन
कामाचे क्षेत्रमराठवाडा
अध्यक्षदीपक नागरगोजे
प्रसिद्ध सदस्यकावेरी नागरगोजे
स्थापना२७ नोव्हेंबर २०००
मुख्यालयआर्वी, शिरूर कासार जिल्हा बीड

मराठवाड्यातील अनाथ, वंचित आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाच्या शिक्षण आणि संगोपनासाठी बीड या दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये आर्वी तालुका शिरूर कासार येथे []शांतीवन आश्रमाची स्थापना[] बावीस वर्षांपूर्वी दीपक नागरगोजे[] यांनी केली

स्वरूप

सध्या या प्रकल्पामध्ये नवजात बालकापासून ते वय वर्ष 18 वयोगटातील मुलांच्या संगोपनाचे शिक्षणाचे आणि दत्तक विधानाचे कार्य केले[] जाते. 300 मुलांची निवासी व्यवस्था या प्रकल्पात आहे. सहा वर्षांपेक्षा लहान वयोगटातील मुलांसाठी शांतीवन मध्ये सुलभा सुरेश जोशी नावाचे शिशुगृह[] स्थापन करण्यात आलेले असून रस्त्यावर टाकून दिलेली मुलं नको असलेली मुलं फेकून दिलेली मुलं संकटात सापडलेल्या या मुलांना या शिशुगृहामध्ये वाढवले जाते.[] तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून कायदेशीर मार्गाने या मुलांचे चांगल्या कुटुंबात पुनर्वसन करण्याचे कामही या प्रकल्पातून होते.

मुलींसाठी प्रकल्प

शांतीवन प्रकल्पात अनाथ वंचित मुलींच्या निवासाची आणि शिक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.[] सध्या 178 मुली या प्रकल्पात शिक्षण घेत असून 500 मुलींकरता नवीन प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. अनाथ वंचित मुलींबरोबरच ऊसतोड कामगारांच्या मुलींनाही या नवीन प्रकल्पात सामावून घेतले जाणार आहे. []बीड जिल्ह्यात सातत्याने भेटसावत असणाऱ्या बालविवाहाच्या प्रश्नांवरती या या प्रकल्पात राबविण्यात आलेले वेगवेगळे प्रयोग बालविवाह या समस्येवर उपाय शोधण्यासाठी पथदर्शी ठरले आहेत.

संदर्भ

  1. ^ a b "वंचितांचे 'शांतिवन'!". Loksatta. 2022-08-22 रोजी पाहिले.
  2. ^ a b author/lokmat-news-network (2019-05-12). "३०० लेकरांची माय ; बीड जिल्ह्यातील 'शांतीवन'चा प्रेरणादायी प्रवास". Lokmat. 2022-08-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Foundation documents Beed couple's success story of farm pond that has 5 crore litres water". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-08-22 रोजी पाहिले.
  4. ^ "Our Work – शांतिवन – वंचितांचा आधारवड / Support for the deprived" (इंग्रजी भाषेत). 2022-08-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-23 रोजी पाहिले.
  5. ^ Shelar, Jyoti (2018-02-16). "The silent sufferers: on farmer suicides in Maharashtra" (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X.
  6. ^ "वंचित मुलींच्या वसतिगृहासाठी मदतीची गरज". Loksatta. 2022-08-22 रोजी पाहिले.