शांता दत्तात्रेय जोग
शांता दत्तात्रेय जोग (जन्म : २ जुलै १९२५; - ५ एप्रिल १९८०) या मराठीतल्या एक नाट्य-चित्रपटअभिनेत्या होत्या. वि.वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राटमध्ये बेलवलकरांच्या भूमिकेत असलेले श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी आणि चंद्रकांत गोखले या चारही नटसम्राटांच्या बरोबर, पत्नी कावेरी हिची भूमिका शांता जोग यांनी साकारली होती.
महाराष्ट्रात १९८०सालच्या आसपासच्या काळात पेट्रोल-डीझेलची अभूतपूर्व कमतरता होती. त्यामुळे लहान गावात नाटक कंपनीची गाडी, तिथे जाताना इंधनाची दोन-तीन पिपे भरून बरोबर घेत असते. त्याच गाडीत नाटकाची ड्रेपरी, नटांचे कपडेलत्ते व इतर सामान, नाटकात भूमिका करणारे कलावंत आणि अन्य सेवकवर्ग बसबरोबर या गावाहून त्या गावाला जात असे. अशाच एका बसमधून जाताना मुंबई-गोवा महामार्गावर बसला आग लागून त्यात शांता जोग, जयराम हर्डीकर आणि इतर कलावंतांचा शेवट झाला.
शांता जोग यांचे नाव टिळकनगर, चेंबूर (मुंबई) येथील एका रस्त्याला दिले गेले आहे. ’शांता जोग करंडक’ हा एका नाट्यस्पर्धेत बालनाट्याला दिला जाणारा पुरस्कार आहे. ’महाराष्ट्र नाट्यवर्धक मंडळा’ने आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेनंतर विजयी एकांकिकेस ’शांता जोग स्मृती करंडक’ दिला जातो.
आत्मचरित्र
शांता जोग यांचे आत्मचरित्र ’रंग आणि दंग’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
शांता जोग यांचे काम असलेले चित्रपट
- आराम हराम आहे
- २२ जून १८९७ (मराठी चित्रपट)
- वऱ्हाडी आणि वाजंत्री
- सोबती
शांताबाईंच्या भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिका
नाटकाचे नाव | भूमिकेतील पात्राचे नाव |
अंगाई | |
ॲन्टिगनी | ॲन्टिगनी |
आंधळ्यांची शाळा | सुशीला |
आश्रित | |
उद्याचा संसार | करुणा |
एकच प्याला | गीता |
एक होता म्हातारा | |
नटसम्राट | कावेरी |
पुत्र मानवाचा | आई |
बिऱ्हाड बाजलं | |
भाऊबंदकी | आनंदीबाई |
भावबंधन | मालती |
मंतरलेली चैत्रवेल | |
मन पाखरू पाखरू | आई |
लग्नाची बेडी | यामिनी |
वैजयंती | वैजयंती |
श्री | श्री |
सत्त्वपरीक्षा | तारामती |
संशयकल्लोळ | कृत्तिका |
सुंदर मी होणार | दीदी |
सूर्याची पिल्ले | बनूताई |
सौभद्र | रुक्मिणी |
हॅम्लेट | मल्लिका |
हृदयस्वामिनी | नंदिनी |
हिमालयाची सावली | बयो |
पहा : अल्पायुषी अभिनेते