Jump to content

शहीद विजय सिंह पथिक क्रीडा संकुल

शहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल
मैदान माहिती
स्थानग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश
गुणक28°28′14″N 77°31′12″E / 28.470467°N 77.519936°E / 28.470467; 77.519936
स्थापना २०१३
आसनक्षमता ८,०००[]
मालक ग्रेटर नोएडा औद्योगिक विकास प्राधिकरण
प्रचालक उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन []
यजमान उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन, अफगाणिस्तान क्रिकेट संघ

आंतरराष्ट्रीय माहिती
शेवटचा बदल ८ मार्च २०१७
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

शहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल हे भारतातील ग्रेटर नोएडा येथे नव्याने बांधण्यात आलेले मैदान आहे.

मैदान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घालून दिलेल्या नियम आणि वैशिष्ट्यांनुसार तयार केले गेले असून तेथे मीडिया आणि कॉर्पोरेट बॉक्स, वैद्यकीय सुविधा, व्यापारी दुकाने, उपहार गृह, माहिती किऑस्क, इत्यादी संबंधित सुविधा उपलब्ध आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये, आयसीसीने पूर्ण सदस्य असलेल्या देशांचे आंतरराष्ट्रीय सामने ह्या मैदानावर खेळविण्यास परवानगी दिली.[] ग्रेटर नोएडा येथील वायएमसीए आणि जेपी रेसॉर्टजवळ हे मैदान आहे.

इतिहास

उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेचे सचिव राजीव शुक्ला यांनी नोव्हेंबर २००९ मध्ये जाहीर केले की ग्रेटर नोएडा येथे क्रीडा शहर उभारणारा जेपी समुह एक क्रिकेटचे मैदानसुद्धा बांधणार आहे आणि युपीसीएने त्यांच्यासोबत पाच-वर्षांसाठी सामने भरविण्याचा करार केला आहे. त्याच वेळी ते हेही म्हणाले कि मैदान २०११ पर्यंत बांधून पुरण होईल आणि त्यावर ट्वेंटी२० आणि एकदिवसीय सामना खेळवले जातील. सुरुवातीला प्रेक्षकक्षमता ४०,००० इतकी असेल आणि नंतर ती १,००,००० इतकी वाढविण्यात येईल. आजमितीला मैदानाचे बांधकाम पूर्ण झालेले असून कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्याच्या दृष्टीने दर्जा मिळविण्यासाठी आयसीसीसोबत बोलणी सुरू आहेत. आतापर्यंत कसोटी आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने सोडून इतर सर्व सामने खेळविण्यास मैदान पात्र आहे.[] ते सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे होम ग्राउंड आहे. मैदानाची सध्याची आसनक्षमता ८,००० इतकी असून ती आधी निर्धारित केली गेल्या प्रमाणे वाढविण्याचे कोणतीही योजना सध्या नाही.

शुक्लांच्या म्हणण्यानुसार, ते ग्रीन पार्कमैदान राज्य सरकारकडून भाडेतत्त्वावर घेण्यास तयार होते परंतून अधिकाऱ्यांना पटविण्यात त्यांना यश आले नाही. ते म्हणाले की कानपूर ते लखनौ दरम्यान स्वतःच्या मैदानासाठी ते जागा शोधत होते.[][]

हे मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या नवीन वैशिष्ट्ये आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार बांधण्यात आले आणि त्याला शहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल असे नाव देण्यात आले. स्टेडियमचे आवार फ्लडलाईट्स, बोलिंग अ‍ॅली, इनडोअर स्टेडियम, टेनिस कोर्ट ह्या सारख्या सुविधांनी सुसज्ज आहे. मैदानावर पहिला रणजी करंडक सामना उत्तर प्रदेश क्रिकेट संघ आणि वडोदरा क्रिकेट संघ यांच्या दरम्यान १ ते ४ डिसेंबर २०१५ रोजी खेळवला गेला.[]

ग्रेटर नोएडा येथे २०१६-१७ दुलीप करंडक स्पर्धेचे सामने खळवले जातील. सर्व सामने हे प्रकाशझोतात गुलाबी चेंडूने खळवले जातील.

अफगाणिस्तानचे होम ग्राऊंड

अफगाणिस्तानने त्यांचे होमग्राऊंड शारजाहून हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता हे मैदान त्यांचे होम ग्राऊंड झाले आहे.[][][१०] एप्रिल २०१६ मध्ये २०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप स्पर्धेतील सामन्यात अफगाणिस्तानने नामिबीयाचा एक डाव आणि ३६ धावांनी पराभव केला.[११][१२]

२५ जुलै २०१६ रोजी, जाहीर करण्यात आले की ह्या मैदानावर अफगाणिस्तान आयर्लंडविरुद्ध एक पूर्ण मालिका आयोजित करणार आहे.[१३] ४-दिवसीय इंटरकॉन्टिनेन्टल कप सामन्याशिवाय, आयर्लंड आणि अफगाणिस्तान दरम्यान मार्च २०१७ मध्ये ५-एकदिवसीय आणि ३-टी२० सामने खेळवले जातील.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "ग्रेटर नोएडा स्टेडियमचे आयसीसी आणि बीसीसीआय अधिकार्‍यांकडून निरिक्षण". टाईम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "२०११ पर्यंत उत्तर प्रदेश मध्ये आणखी एक क्रिकेट मैदान". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  3. ^ "पूर्ण सदस्यांचे सामने ग्रेटर नोएडा येथे खेळवण्यासाठी आयसीसीची परवानगी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  4. ^ "फिरोजशाह कोटलाला ग्रेटर नोएडा स्टेडियमचे आव्हान". हिंदुस्तान टाईम्स (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ "युपीला २०११ पर्यंत आणखी एक मैदान मिळणार". टाईम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2011-08-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ८ मार्च २०१५ रोजी पाहिले.
  6. ^ अधिकृत संकेतस्थळ
  7. ^ "उत्तर प्रदेश-वडोदरा रणजी सामन ग्रेटर नोएडा येथे हलविला". टाईम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१५ रोजी पाहिले.
  8. ^ "अफगाणिस्तानचे घरचे सामने भारतात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ११ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
  9. ^ "नोएडा लवकरच अफगाण क्रिकेटपटूंचे घर" (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  10. ^ "प्रथम-श्रेणी सामने ग्रेटर नोएडा क्रिकेड संकुल येथे". क्रिकेट आर्काईव्ह (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१७ रोजी पाहिले.
  11. ^ आयसीसी इंटरकॉन्टिनेन्टल कप, अफगाणिस्तान वि नामिबीया, ग्रेटर नोएडा, १०-१३ एप्रिल २०१६
  12. ^ शाहझाद, फिरकी गोलंदाजामुळे अफगाणिस्तानचा डावाने विजय
  13. ^ "आयर्लंड, अफगाणिस्तान ग्रेटर नोएडा येथे नऊ सामने खेळणार". क्रिकबझ (इंग्रजी भाषेत). ८ मार्च २०१७ रोजी पाहिले.