शहादा तालुका
?शहादा महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | नंदुरबार |
लोकसंख्या • घनता | ४९,६९७ (२००१) • २६७/किमी२ |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 425409 • +०२५६५ • MH 39 |
शहादा(इंग्रजी- Shahada) हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
आभणपूर आडगाव (शहादा) आकसपूर आळखेड अंबापूर (शहादा) आमोदे (शहादा) आणकवडे (शहादा) अनरड असलोड असुस औरंगपूर (शहादा) आवगे बहिरपूर बामखेडा तर्फे सारंगखेडा बामखेडा तर्फे तऱ्हाड भडे (शहादा) भडगाव (शहादा) भागापूर भोंगरा भोरटेक भुलाणे भुटे बिलाडी तर्फे हवेली बिलाडी तर्फे सारंगखेडा बोराळे (शहादा) ब्राम्हणपुरी बुडीगव्हाण बुपकारी चांदसैली चिखली बुद्रुक (शहादा) चिखली खुर्द चिरडे चिरखाण दामल्डे दामेरखेडा दरा (शहादा) देऊर (शहादा) धामलड धांदरे बुद्रुक धांदरे खुर्द धुरखेडा दोंदवडे डोंगरगाव (शहादा) दुधखेडा फत्तेपूर (शहादा) फेस गणोर गोदीपूर गोगापूर हिंगणी (शहादा) होळ (शहादा) होळगुजरी इस्लामपूर (शहादा) जावडे तर्फे हवेली जाईनगर जाम जावडे तर्फे बोराड जवखेडे जुनावणे कहाटुळ काकर्डे बुद्रुक काकर्डे खुर्द कळंबु कळमाड तर्फे हवेली कळमाडी तर्फे बोराड कळसाडी कामरावड कानडी खुर्द कानडी तर्फे हवेली कानसई (शहादा) करजाई करणखेड करजोत कातघर काथार्डेदिगर काथार्डेखुर्द कौथळ तर्फे सारंगखेड कौथळ तर्फे शहादे कवळीथ खैरवे (शहादा) खामखेड खापरखेड खारगाव (शहादा) खेडदिगर कोचरे (शहादा) कोंडवळ कोटबांधणी कोठाळी तर्फे हवेली कोठाळी तर्फे सारंगखेडा कुढवड कुकावळ कुकडेळ कुरंगी कुऱ्हावड तर्फे सारंगखेडा कुसुमवाडे लाचोरे लक्कडकोट (शहादा) लांबोळे लंगडीभवानी लोहारे (शहादा) लोंढारे लोणखेड माडकणी माळगाव (शहादा) माळोणी मानराड मांदणे मानमोड्या माटकुट म्हसवड (शहादा) मोहिदे तर्फे शहादे मोहिदे तर्फे हवेली मुबारकपूर (शहादा) नागझिरी (शहादा) नांदर्डे नांदरखेडा नांदया नवागाव (शहादा) नवलपूर नवानगर (शहादा) नवी असलोड निंबार्डी निंभोरे (शहादा) ओझरटे पाडळदे बुद्रुक पाडळदे खुर्द पळसवडे (शहादा) पारी पिंपर्डे पिंपलोड (शहादा) पिंपरणी पिंपरी (शहादा) पिंगणे प्रकाशा पुरुषोत्तमनगर पुसनाद रायखेड रामपूर (शहादा) राणीपूर (शहादा) सारंगखेड ससाडे सावखेड सावळदे शहाडे (शहादा) शाहणे शेलटी (शहादा) शिरुडदिगर शिरुड तर्फे हवेली श्रीखेड सोनवड तर्फे एस सोनवळ तर्फे बोराड सोनवळ तर्फे हवेली सुलतानपूर (शहादा) सुळवडे तळवाडी तऱ्हाडी तर्फे बोराड तवळाई टेंभाळी टेंभे बुद्रुक (शहादा) टेंभे तर्फे एस ठेंगचे तिढारे तिखोरे तितारी तोरखेडा तुकी उभादगड उधलोड उखळशेम उमर्टी उंटवड वडाळी (शहादा) वडशीळ वडगाव (शहादा) वैजाळी (शहादा) वर्दे वरधे वारूळ तर्फे एस विरपूर (शहादा) वाडी (शहादा) वाघर्डे वाघोडे (शहादा) वेलवड (शहादा)
पार्श्वभूमी
हे शहर नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुक्यांपैकी एक आहे.शहादा हे शहर १ जुलै १९९८ पर्यंत धुळे या जिल्हात होते.१ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्हा विभागून त्याचे दोन भाग करण्यात आले आणि नंदुरबार जिल्हा तयार झाला. शहादा हे नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे ५०००० लोकसंख्या,आणि सर्वात जास्त साक्षरता असलेले शहर आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात जास्त प्रगत आणि स्वच्छ शहर आहे.शहादा हे शहर मुख्यता शैक्षणिक सुविधा व दक्षिण काशी या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रासाठी ओळखले जाते, जे शहद्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. शहर आणि परिसराचे भाग्य विधाते म्हणून "सहकार महर्षी व शिक्षण महर्षी स्व:.अण्णासाहेब पी.के.पाटील" यांचे नाव अजरामर आहे.शहादा परिसरात साखर कारखाना , सूत गिरणी तसेच इतर उद्योगधंदे त्यांनी आणले. लोणखेडा येथे पूज्य साने गुरुजी यांच्या नावाने शिक्षणाची गंगा आणली,ह्या अंतर्गत सर्वच प्रकारचे शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शहादा शहरात स्वातंत्र पूर्व काळतील मुन्सिपल हायस्कुल ही शाळा ही आहे,वसंतराव हायस्कुल.
तालुका हा तीन राज्यच्या सीमेवर वसलेले हा हे महाराष्ट्र, गुजरात, व मध्य प्रदेश .
इतिहास आणि लोकसंख्या
शहाद्याच्या नैऋत्य दिशेस १५ किलोमीटर अंतरावर प्रकाशा हे गाव आहे. हे महाराष्ट्रातील दुसरया क्रमांकाचे उत्खनन क्षेत्र आहे.१९५५ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वतीने बी. के. थापर यांनी तापी आणि गोमती नद्यांच्या संगमाजवळ उत्खनन केले.या उत्खननामध्ये १७ मीटर खोलवर १७०० पूर्वीची दगडाची हत्यारे,तांबे आणि कमी प्रतीच्या काश्याची भांडी सापडली. शहाद्याच्या उत्तर दिशेला ६ किलोमीटर अंतरावर गोमती नदीच्या पात्रात कित्येक दशकापुर्वीची लेणी आहेत. प्रमुख लेणे महावीर लेणे म्हणून प्रसिद्ध आहे व बाकीच्या लेण्यांना पांडव लेणी किंवा पांच पांडव म्हणून ओळखले जाते. यावरून हे स्पष्ट होते कि शहादा आणि गोमती नदीच्या तीरावरील परिसर १७०० च्याही पूर्वीपासून वसलेला आहे.शहादा-कुकडेल नगरपालिका १८६९ मध्ये ब्रिटिश शासनात स्थापन झाली. १९६१च्या जनगणनेनुसार शहाद्याची लोकसंख्या १३३३८ होती.
भारताच्या २००१ च्या जनगणनेनुसार शहाद्याची लोकसंख्या ४९६९७ होती. ज्यामध्ये ५२% पुरुष आणि ४८% महिलांची संख्या होती.शहाद्याची सरासरी साक्षरता ७१% आहे जी देशाच्या ५९.५% सरासरी साक्षरतेपेक्षा जास्त आहे .पुरुष साक्षरता ७७% आहे तर महिलांची साक्षरता ६५% आहे.शहद्यामध्ये १४ % लोकसंख्या ही ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची आहे. नंदुरबार जिल्ह्यात आणि शहादा तालुक्यात मराठी, पावरी,भिल्ल,अहिराणी,गुजर आणि हिंदी भाषा बोलल्या जातात.
भौगोलिक रचना आणि हवामान
शहादा हे समुद्रसपाटीपासून सरासरी ४५५ फुट उंचावर आहे. सातपुडा पर्वतरांगा शहाद्याच्या उत्तर दिशेला केवळ ३० किलोमीटर दूर असल्यामुळे येथील जमिनीखाली ५ मीटर अंतरावरच खडक लागतो. नैसर्गिक आणि मानवनिर्मित खाणींमुळे,व ऑगस्ट २००६ च्या मुसळधार पावसामुळे शहद्यापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळदे या गावामधील मैदानाचे खनन झाले होते. त्यामुळे १० नोवेंबर २००६ मध्ये येथे २.८ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. शहरातील कोलाहलापासून दूर असलेल्या या गावात भूकंप मापन केंद्र स्थापित केल्या गेले आहे. जमिनीखालील खडकाच्या वरील माती काही अपवाद सोडले तर शेतीसाठी सुपीक आहे.येथे सरासरी ५५२ मिमीपाऊस पडतो. बऱ्याचवेळा इथले हवामान उष्ण असते.उन्हाळ्यात कमाल तापमान ४८°सें. असते. तर हिवाळ्यात ते ९°सें. पर्यंत कमी होते. पावसाळा आणि हिवाळ्याचे काही महिने सोडले तर इथले हवामान मुख्यता कोरडे असते.
अर्थव्यवस्था
शेती हे येथील लोकांचे उपजीविकेचे मुख्य साधन आहे.वर्षभर इथे उस,केळी,कापूस,मका,ज्वारी आणि गव्हाचे पिक घेतले जाते. आजूबाजूच्या गावातून लोक इथे खरेदीसाठी आणि आरोग्य सुविधांसाठी येतात. त्यामुळे शहादा हे शहर नेहमी लोकांनी गजबजलेले असते.पुरुषोत्तम मार्केट न.१,पुरुषोत्तम मार्केट नं.२,६४ गाला मार्केट,काशिनाथाभाई मार्केट,पुष्पकमल मार्केट ही काही मुख्य मार्केट आहेत.शहादा शहरामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया,सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,देना बँक,बँक ऑफ इंडिया,युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक,सारख्या सरकारी बँकांच्या शाखा आहेत. आय.सी.आय.सी.आय. एच डी एफ.सी बँक ,सारख्या खाजगी बँकेची सुद्धा इथे शाखा आहे.पिपल्स बॅक,हस्ती बँक दि.नंदुरबार जिल्हा मर्चंड बँक या सारख्या व्यापारी बँका.या बरोबरच धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड. इथे ऑगस्ट १९९८ पासून एल आय सीची शाखाही आहे. (DDCC) सारखी स्थानिक बँक सुद्धा आहे जी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सूचीमध्ये सामील आहे.फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आय.सी.आय.सी. आय.एच.डी.एफ.सी बँक,युनियन बॅक,बॅक ऑफ इंडिया , महाराष्ट्र बँक,दि.शिरपूर पिपल्स बँक इ. ची एटीएम मशीन आहेत.
ठिकाणे
- तोरणमाळ - हे महाराष्ट्रातील दुसरया क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे, जे शहद्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे.हे महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच आणि थंड हवेचे ठिकाण आहे. येथे जातांना राणीपूर या गावापासून सातपुडा पर्वत रांगा सुरू होते. जातांना रस्त्यावर लेगापाणी हे आयुर्वेदिक वनस्पती औषधीचे गाव आहे. तिथुन पुढे गेल्यावर कालापानीपासुन सात पायरी घाट सुरू होते. तोरणमाळ येथे यशवंत तलाव व कृष्ण नावाचे तळे आहे जे नेहमी कमळाच्या फुलांनी बहरलेले असते. पाहण्यासारखे नानागर्जन गुफा आहे सीताखाई गुफा आहे. हे सुट्टी घालवण्याचे आवडते ठिकाण आहे. जे एका दिवसाच्या सहलीसाठी खूप चांगले ठिकाण आहे.येथे संपूर्ण आदिवासी लोकांचे वास्तव्य आहे.
- उनपदेव - हे ठिकाण शहद्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. इथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत, जे उन्हाळात सुद्धा वाहत असतात. इथे असलेल्या गायमुखातून नेहमी पाणी वाहायचे. पण जून २००७ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीकिनारी असलेले काही बांधकाम उध्वस्त झाले.
- शैक्षणिक - शहादा शहरात विश्राम काका शैक्षणिक संकुलात ,शेठ व्ही के शहा विद्या मंदिर व गंगाबेन फकिरा पाटील महाविद्यालय आहे या ठिकाणी 5000 विद्यार्थी विविध अभ्यासक्रमत दर्जेदार शिक्षण घेतात .शहरात हे एक नामांकित शैक्षणिक परिवार आहे. **राजकीय;-शहादा नगरपालिका वर भारतीय जनता पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आहोत.डॉ.हिनाताई गावित ह्या खासदार आणि मा.राजेश पाडवी आमदार आहेत **सामाजिक;:गंगोत्री फौंडेशन ,शहादा ही संस्था सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे ,या संस्थेचे अध्यक्ष मा अभिजीत दादा पाटील आहेत.तसेच शहरातील संकल्प ग्रुप हा विविध क्षेत्रात त्यांचे समाज कार्य करत असतो.
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
नागरी सुविधा
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
नंदुरबार जिल्ह्यातील तालुके |
---|
अक्कलकुवा तालुका | अक्राणी तालुका | तळोदे तालुका | नंदुरबार तालुका | नवापूर तालुका | शहादा तालुका |