शरश्चंद्र मुक्तिबोध
शरश्चंद्र मुक्तिबोध (१९२१ - १९८४) हे मराठी नवकवी, कादंबरीकर व समीक्षक होते. नवी मळवाट आणि यात्रिक हे कवितासंग्रह, काही निबंध (१९६३), जीवन आणि साहित्य (१९७२) आणि सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (१९७८) हे त्यांचे निवडक लेखन आहे.
पुस्तके
- काही निबंध (ललित)
- जन हे वोळतु जेथे (कादंबरी)
- जीवन आणि साहित्य (समीक्षा)
- नवी मळवाट (कवितासंग्रह)
- मुक्तिबोधांची निवडक कविता (कवितासंग्रह)
- यात्रिक (कवितासंग्रह)
- सत्याची जात (कवितासंग्रह)
- सरहद्द (कादंबरी)
- सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य (समीक्षा)
- क्षिप्रा (कादंबरी)
सन्मान आणि पुरस्कार
- सृष्टि, सौंदर्य आणि साहित्यमूल्य या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार (१९७९)