शमीक
शमीकऋषी हे भारतीय पुराणकथांमधील एक ऋषी आहेत.
कथा
अर्जुनाचा पुत्र परीक्षितराजा शिकारीसाठी गेला असता त्याला शमीकऋषींचा आश्रम दिसला. शमीकऋषींनी मौनव्रत धारण केल्यामुळे परीक्षितराजाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत, याचा परीक्षितराजाला राग आला व त्याने शमीकऋषींच्या गळ्यात साप टाकून त्यांची अवहेलना केली. हे समजल्यावर शमीकऋषींचा पुत्र शृंगी याने परीक्षितराजाला शाप दिला की त्याचा मृत्यू सातव्या दिवशी तक्षक नावाच्या नागाच्या दंशामुळे होईल व तसेच झाले. याचा सूड म्हणून पुढे परीक्षितराजाचा पुत्र जनमेजय याने उत्तंकऋषींच्या साहाय्याने सर्पसत्र केले अशी पुराणकथा आहे.