शमशाद बेगम
शमशाद बेगम | |
---|---|
जन्म | १४ एप्रिल १९१९ अमृतसर, पंजाब |
मृत्यू | २४ एप्रिल २०१३ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायिका |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९३४ – १९७५ |
भाषा | हिंदी |
पुरस्कार | पद्मभूषण (२००९) |
शमशाद बेगम (एप्रिल १४ १९१९- २४ एप्रिल २०१३) या भारतीय गायिका होत्या. त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिल्या पार्श्वगायिकांपैकी एक होत्या.त्यांनी ५७७पेक्षा जास्त चित्रपटांत गाणी गायली आहेत.
शमशाद बेगम यांचा जन्म अमृतसर, पंजाब येथे झाला. २००९ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्याच वर्षी त्यांना पुण्यातील ओ.पी. नय्यर फाउंडेशनचा ओ.पी. नय्यर पुरस्कार प्रदान झाला. [१]
प्रसिद्ध गाणी
- लेके पेहला पेहला प्यार - सी.आय.डी. (१९५६)
- मिलते ही, आँखे दिल हुआ
- कभी आर कभी पार – आर पार
- मेरी नींदो मे तुम - नया अंदाज
- ओ गाड़ीवाले गाड़ी धीरे हाँक रे
- कहीं पे निगाहे कहीं पे निशाना - सी.आय.डी. (१९५६)
- मेरे पिया गये रंगून - पतंगा
- एक तेरा सहारा – शमा
- कज़रा मोहब्बतवाला आँखियोमे ऐसा डाला, (आशा भोसले बरोबर द्वंद्वगीत) - किस्मत (१९६८) - संगीत: ओ.पी. नय्यर
शमशाद बेगम यांनी गायनाची सुरुवात रेडियो पासून केली .. इ.स. १९३७ मध्ये लाहौर येथे रेडियोवर त्यांनी पाहिले गाणे गायले. आणि त्यांनतर त्यांना पेशावर, लाहोर आणि दिल्ली रेडियो स्टेशनवरही गाणी गायला मिळाली. त्या नंतर त्यांनी लाहोरमध्ये निर्माण झालेले चित्रपट खजांची आणि खानदान यांसाठी गाणी म्हटली. ही गाणी अतिशय लोकप्रिय झालीआणि भारतभ गाजली. त्यानंतर इ.स. १९४४ मध्ये त्या स्वप्नाची नगरीत, मुंबईत, आल्या.
मुंबईमध्ये आल्यानंतर शमशाद यांनी नौशाद अली, राम गांगुली, एस.डी. बर्मन, सी रामचंद्र, खेमचंद प्रकाश आणि ओ.पी. नय्यर सारख्या दिग्गज संगीतकारांसाठी गाणी गायली .