Jump to content

शब्दगंध साहित्य संमेलन

महाराष्ट्रातल्या अहमदनगर शहरातली शब्दगंध साहित्यिक परिषद ही संस्था हे शब्दगंध साहित्य संमेलन भरवते. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे सध्या धुरा संभाळत आहेत (२०१९).

यापूर्वी झालेली शब्दगंध साहित्य संमेलने :-

  • १ले : अहमदनगर, संमेलनाध्यक्ष बाबासाहेब सौदागर,[] स्वागताध्यक्ष सुधा कांकरिया, उद्‌घाटक यशवंत भापकर व अरुण जगताप
  • २रे : हिवरे बाजार(जिल्हा अहमदनगर), संमेलनाध्यक्ष नामदेवराव देसाई, उद्‌घाटक रावसाहेब शिंदे
  • ३रे : निंबळक(जिल्हा अहमदनगर), संमेलनाध्यक्ष शिवाजीराव देवढे, उद्‌घाटक डॉ. रावसाहेब कसबे, स्वागताध्यक्षा लता पवार
  • ४थे : अहमदनगर, ११-२-२००६, संमेलनाध्यक्ष डी..एम. कांबळे, उद्‌घाटक द्वारकानाथ अष्टेकर, स्वागताध्यक्ष अभय आगरकर
  • ५वे : अहमदनगर, २००७, संमेलनाध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, स्वागताध्यक्ष संदीप कोतकर, उद्‌घाटक नागनाथ कोत्तापल्लेप्रभाकर पणशीकर
  • ६वे : अहमदनगर, १७-१८ मे २००८, संमेलनाध्यक्ष संजय कळमकर, स्वागताध्यक्ष शंकरराव घुले, उद्‌घाटक दिलीप वळसे पाटील
  • ७वे : अहमदनगर, १-२ ऑगस्ट २००९, संमेलनाध्यक्ष कवी फ.मु. शिंदे
  • ८वे : अहमदनगर, २०१०, संमेलनाध्यक्ष कवी प्रकाश घोडके
  • ९वे : अहमदनगर, १६-१०-२०११, संमेलनाध्यक्ष लोककवी प्रशांत मोरे
  • १०वे : अहमदनगर, ८ डिसेंबर २०१२(नियोजित), संमेलनाध्यक्ष लहू कानडे, स्वागताध्यक्ष राजीव राजळे
  • ११वे : अहमदनगर, अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजीत भालेराव (जानेवारी २०१५)
  • १२वे : शनिशिंगणापूर, अध्यक्षपदी प्रा. डॉ. अशोक शिंदे (२४-२५ डिसेंबर २०१६)
  • १३वे : अहमदनगर, अध्यक्षपदी भारत सासणे (२८-२९ जानेवारी २०१८), उद्‌घाटक माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे
  • १४वे, अहमदनगर, अध्यक्षपदी ॲड. डाॅ. बाळ ज. बोठे पाटील (१-२ फेब्रुवारी २०१९)
  • शब्दगंध साहित्यिक परिषद ही संस्था दरवर्षी साहित्य, शिक्षण, वृत्तपत्र, लेखन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शब्दगंध पुरस्कार देते. इ.स. २०११सालचा शब्दगंध साहित्य शिक्षक पुरस्कार

जिल्हा परिषद प्रशालेतील घनसावंगी येथील कला शिक्षक अशोक जोशी यांना देण्यात आला.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संकेतस्थळ[permanent dead link]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ बाबासाहेब सौदागर. "जिंदगीचं रडगाणं व्हायची वेळ आली तेव्हा गाण्यानं सावरलं". २० जुलै, २०१२ रोजी पाहिले. शब्दगंध'च्या पहिल्या साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष झालो. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]