शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश
शबरीमला मंदिर हे केरळच्या पथनामथिट्टा जिल्ह्यातील एक मंदिर आहे. पारंपारिकपणे प्रजननक्षम वयातील स्त्रियांना तेथे पूजा करण्याची परवानगी नव्हती, यामागचे कारण येथील देव ब्रह्मचारी होता. केरळ उच्च न्यायालयाच्या निकालाने या व्याख्येला कायदेशीर मान्यता दिली होती आणि १९९१ पासून भारतीय कायद्यानुसार महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई होती.
सप्टेंबर २०१८ मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की, लिंगाचा भेदभाव न करता सर्व हिंदू भाविक मंदिरात प्रवेश करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने असे मानले की "जैविक भिन्नतेमुळे महिलांवर ठेवलेला कोणताही अपवाद संविधानाचे उल्लंघन करतो." या परंपरेने कलम १४ अंतर्गत समानतेच्या अधिकाराचे आणि कलम २५ अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचे उल्लंघन होत असल्याचे घटनापीठाने म्हणले.
या निकालाचा लाखो अयप्पा भक्तांनी विरोध केला.[१][२] एका महिन्यानंतर, सुमारे १० महिलांनी शबरीमालामध्ये प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या प्रयत्नापूर्वी त्यांच्यावर शारीरिक हल्ल्याच्या धमक्या आल्या होत्या.[३] चालू असलेल्या निषेधाला झुगारून, पूर्वी प्रतिबंधित असलेल्या वयोगटातील दोन महिला कार्यकर्त्यांनी शेवटी २ जानेवारी २०१९ च्या पहाटे मागील प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश केला.[४] ही कथित घटना मंदिराच्या पुजारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा मंदिर शुद्धीकरण विधीसाठी बंद ठेवले गेले.[५][६][७]
संदर्भ
- ^ "शबरीमाला मंदिर प्रवेश मुद्द्यावर सर्व स्त्रिया एकच भूमिका घेत नाहीत? - विश्लेषण". BBC News मराठी. 2018-11-18. 2022-02-03 रोजी पाहिले.
- ^ "Sabarimala Temple protests: What is happening in Kerala". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-10-19. 2022-02-03 रोजी पाहिले.
- ^ "As Women Return, Sabarimala Head Priest Says "We Stand With Devotees": Highlights". NDTV.com. 2022-02-03 रोजी पाहिले.
- ^ "Lokmat".
- ^ PambaJanuary 2, P. S. Gopikrishnan Unnithan; January 4, 2019UPDATED:; Ist, 2019 13:12. "Two women below 50 enter Sabarimala, temple shuts for purification rituals". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-02-03 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "महिलांच्या प्रवेशानंतर शबरीमाला मंदिर शुद्धीकरणासाठी बंद". TV9 Marathi. 2019-01-02. 2022-02-03 रोजी पाहिले.
- ^ Service, Tribune News. "2 women enter Sabarimala; temple shut for 'purification'". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-02-03 रोजी पाहिले.