Jump to content

शत्रुघ्न

शत्रुघ्न (थाई : सत्रुत; बर्मी : थरुगन; तमिळ : चत्रुक्कन; मलायी : चित्रदन )

शत्रुघ्न हा रामायणात उल्लेखलेल्या अयोध्येचा इक्ष्वाकुवंशीय राजा दशरथ व त्याची पत्‍नी सुमित्रा यांचा पुत्र आणि रामाच्या तीन सावत्र भावांपैकी एक होता. लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे जुळे भाऊ होते. शत्रुघ्नाचे लग्न विदेहाचा राजा कुशध्वज जनक याच्या श्रुतकीर्ति नामक कन्येशी झाले. कुशध्वजाची दुसरी कन्या मांडवी ही भरताची बायको होती.

शत्रुघ्नाने मधुपुरीचा (सध्याच्या मथुरेचा) राजा लवणासुराचा वध करून मधुपुरी पुन्हा वसवली व तेथे किमान बारा वर्षे राज्य केले.