शंकरराव साळवी
शंकरराव साळवी | |
---|---|
जन्म | जुलै १५, इ.स. १९३२ महाराष्ट्र |
मृत्यू | फेब्रुवारी १५, इ.स. २००७ |
इतर नावे | बुवा साळवी |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | खेळ कबड्डी |
भाषा | मराठी |
पुरस्कार | शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार |
शंकरराव उर्फ बुवा साळवी[१] ( १५ जुलै, इ.स. १९३२ - १५ फेब्रुवारी २००७) हे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार विजेते कबड्डी संघटक होते. १५ जुलै हा दिवस बुवा साळवी यांचा जन्मदिवस ‘महाराष्ट्र कबड्डी दिन’ या नावाने साजरा करण्यात येतो.
बुवा साळवी महाराष्ट्राच्या कबड्डी खेळाचे आधारस्तंभ होते आणि अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्ष होते. ते विधुर होते आणि त्यांना मुले नव्हती.
अनेकांचा विरोध डावलून, नऊ खेळाडूंचा ’हुतुतू’ आणि सात खेळाडूंचा ’आंतराराष्ट्रीय कबड्डी’ यांचे संमीलन घडवून बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून दिली. ’हुतुतू’चे पुरस्कर्ते ’कबड्डी’शी एकरूप होण्यास अजिबात तयार नव्हते. दक्षिणेकडील राज्यांना उत्तर हिंदुस्थानात वापरला जाणारा कबड्डी हा शब्दतर अजिबात मान्य नव्हता; त्यांना हुतुतू हेच नाव आणि नऊ खेळाडूंचा संघ हेच हवे होते. बुवा साळवी महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत गावोगाव फिरले आणि त्यांनी आपल्या वक्तृत्वकौशल्याने नाराज खेळाडूंची समजूत काढली.
बुवा साळवींच्या प्रयत्नांमुळे कबड्डीचा आंतरराष्ट्रीय एशियन गेम्स १९९०मध्ये प्रवेश झाला, आणि पुढील पाच चतुर्वार्षिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवता आले. भारताच्या बाहेर जपान, पाकिस्तान, आणि बंगला देश यांचे संघही कबड्डी खेळू लागले.
बुवा साळवी यांचा भारतीय ऑलिंपिक असोसिएशनशी बऱ्याच काळासाठी संबध होता.
साळवी यांचे दीर्घ आजारानंतर वयाच्या ७५व्या वर्षी देहावसन[२] झाले.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "शंकरराव साळवी उर्फ बुवा". रोजी मूळ पानापासून संग्रहित2013-08-09. 2013-08-22 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "बुवा साळवी यांची शोकसभा". १३ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित.