Jump to content

शंकर वामन दांडेकर

प्राचार्य शंकर वामन दांडेकर (प्रचलित नांवे सोनोपंत दाण्डेकर, वा सोनुमामा दांडेकर, किंवा मामासाहेब दांडेकर) (जन्म : एप्रिल २०, १८९६ - - जुलै ९, १९६८) हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

प्रकाशित साहित्य

  • अध्यात्मशास्त्राची मूलतत्त्वे: प्रसाद प्रकाशन
  • अभंग : य.गो. जोशी प्रकाशन
  • अभंग संकीर्तन-भाग १ ते ४ : प्रसाद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन
  • ईश्वरवाद : प्रसाद प्रकाशन, य.गो. जोशी प्रकाशन
  • श्रीसंत चोखामेळा महाराज यांचें चरित्र व अभंग गाथा : मंदाकिनी स. कदम प्रकाशन
  • तीन प्रवचने : प्रसाद प्रकाशन
  • तुकाराम गाथा : वारकरी प्रकाशन संस्था
  • दैनिक स्वाध्याय : अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन
  • धुंडामहाराज देगळूरकर श्रीज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ : ज्ञानेश्वरी सुवर्ण महोत्सव समिती पंढरपूर प्रकाशन
  • भारतातील थोर स्त्रिया
  • वारकरी जीवन
  • वारकरी पंथाचा इतिहास : कॉन्टिनेन्टल प्रकाशन
  • वारकरी भजन संग्रह
  • विष्णूबुवा जोग महाराजांचे चरित्र
  • श्रीमद्भगवद्गीता : महाराष्ट्र सरकारचे प्रकाशन (Government Central Press)
  • सटीप ज्ञानेश्वरी : प्रसाद प्रकाशन
  • सार्थ ज्ञानेश्वरी : स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
  • साक्षात्कारपथावर तुकाराम अर्थात तुकारामांचे आध्यात्मिक चरित्र
  • सोनोपंत दांडेकर यांची प्रवचने (संकलनः सुरेश गरसोळे, नंदिनी पब्लिशिंग)
  • सौंदर्याचे व्याकरण : चिंतामणी साहित्य सहयोग प्रकाशन
  • श्री ज्ञानदेव चरित्र, ग्रंथ आणि तत्त्वज्ञान
  • ज्ञानदेव आणि प्लेटो
  • श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान : नागपूर प्रकाशन
  • ज्ञानेश्वरी अध्याय सातवा : व्हीनस प्रकाशन
  • ज्ञानेश्वरी अध्याय बारावा : व्हीनस प्रकाशन
  • ज्ञानेश्वरीतील कठीण शब्दांचा कोश : य.गो. जोशी प्रकाशन
  • सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना : काँटिनेन्टल प्रकाशन
  • ज्ञानेश्वरी सेवा गौरव ग्रंथ : ब.गि.घाटे प्रकाशन

सन्मान आणि पुरस्कार

  • पालघर (पालघर जिल्हा) येथील एका महाविद्यालयाला सोनोपंत दांडेकरांचे नाव दिले आहे.
  • सोनोपंत दांडेकर यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या तत्त्वज्ञानविषयक ग्रंथाला दिला जातो. म.वि. गोखले यांनी ठेवलेला हा पुरस्कार २०१६ साली शकुंतला आठवले यांच्या ‘भारतीय तत्त्वविचार’ या ग्रंथाला मिळाला आहे.

२०१७ सालचा पुरस्कार डॉ. यश वेलणकर यांच्या ‘ध्यान विचार’ आणि डॉ. संज्योत देशपांडे यांच्या ‘अटळ दुःखातून सावरताना’ या पुस्तकांना विभागून दिला आहे.

बाह्य दुवे