Jump to content

शंकर नारायण नवरे

शंकर नारायण नवरे

शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना (जन्म : २१ नोव्हेंबर, १९२७ - २५ सप्टेंबर, इ.स. २०१३) हे मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले.

डोंबिवलीत झालेल्या २००३सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता.

ते डोंबिवलीत रहात. त्यांच्या पत्नीचे नाव अंजली, मुलाचे अरुण, सुनेचे जान्हवी. मुलगी राधिका, नातू शंतनू आणि पणतू ओम. वयाच्या ८६व्या वर्षी शं.ना. नवरे यांचे निधन झाले. अरुण आणि जान्हवी हे दोघेही ॲडव्होकेट आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अघळपघळव्यक्तिचित्रण आणि आठवणीनवचैतन्य प्रकाशन
अट्टहासकादंबरी
अनावरकथासंग्रह
आनंदाचे झाडकादंबरी
इंद्रायणीकथासंग्रह
ऊनसावल्यानवचैतन्य प्रकाशन
एकमेककथासंग्रह
ओलीसुकीस्तंभलेखसंग्रहलोकसत्ता, दिलीप प्रकाशन
कस्तुरीकथासंग्रह
कळत नकळतपटकथा
काला पहाडएकांकिका
कैवारीपटकथा
कोवळी वर्षेकथासंग्रह
कौलंकादंबरीनवचैतन्य प्रकाशन
खलिफाकथासंग्रह
खेळीमेळीनाटक
गहिरे रंगनाटक
गुंतता हृदय हेनाटक
गुलामनाटक
घरकुलपटकथा
जत्राकथासंग्रह
जनावरएकांकिका
झब्बूकथासंग्रह
झोकानवचैतन्य प्रकाशन
[[]]
झोपाळास्तंभलेखदैनिक महानगर, दीपरेखा प्रकाशन
डागएकांकिका
तिन्हीसांजानवचैतन्य प्रकाशन
तिळा दार उघडकथासंग्रह
तू तिथं मीपटकथा
दिनमानकादंबरी
दिवसेंदिवसकादंबरी
देवदासनाटक
दोघांमधले नातेनाटक
दोन यमांचा फार्सएकांकिका
धुक्यात हरवली वाटनाटक
नवरा म्हणू नये आपलानाटक
निवडक शंनाकथासंग्रह
निवडुंगकथासंग्रह
निवडुंगपटकथा
परिमिताकथासंग्रह
पर्वणीविनोदीनवचैतन्य प्रकाशन
पसंत आहे मुलगीनाटक
पैठणीकथासंग्रह
बाजीरावचा बेटापटकथा
बिलोरीकथासंग्रह
बेलाकथासंग्रह
भांडणकथासंग्रह
मन पाखरू पाखरूनाटक
मनातले कंस / एकमेकदोन भागातील कथा संग्रहनवचैतन्य प्रकाशन
मर्जीतल्या फुलाकथासंग्रह
मला भेट हवी होनाटक
मार्गएकांकिका
मार्जिनाच्या खुणाकथासंग्रह
मेणाचे पुतळेकथासंग्रह
मोरावर चोरएकांकिका
रंगसावल्यानाटक
वर्षावनाटक
वाराकथासंग्रह
शन्ना डेस्तंभलेखसंग्रह
शहाणी सकाळनाटक
शांताकुकडीकथासंग्रह
सखीकथासंग्रह
सर्वोत्कृष्ट शन्नाकथासंग्रह
सवत माझी लाडकीनाटक
संवाद आणिनो प्रॉब्लेमकादंबरीनवचैतन्य प्रकाशन
सुरूंगकादंबरीनवचैतन्य प्रकाशन
सूर राहू देनाटक
हसत हसत फसवुनीनाटक

तिन्हीसांजा, ,

शं.ना. नवरे यांना मिळालेले पुरस्कार

  • गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार (नोव्हेंबर २००८)
  • डोंबिवली भूषण पुरस्कार
  • विष्णूदास भावे पुरस्कार (नोव्हेंबर २००९)
  • साहित्यसेवा पुरस्कार (ऑगस्ट २००८)

गौरव

  • मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष

संकीर्ण

शं.ना. नवरे यांच्यावर 'गोष्टीवेल्हाळ शन्ना' हा लघुपट निघाला आहे. काही जुन्या नाटकांचे दुर्मिळ चलत् चित्रण व जुन्या सहकाऱ्यांनी (डॉ. जब्बार पटेल, विक्रम गोखले, बाळ कुडतरकर, प्रदीप वेलणकर इ.) सांगितलेल्या शन्नांच्या रमणीय आठवणी या लघुपटात अनुभवायला मिळतात.

बाह्य दुवे