Jump to content

व्होल्कान दे फुएगो

१९७४मध्ये व्होल्कान दे फुएगोचा विस्फोट होत असताना

व्होल्कान दे फुएगो तथा चिगाग हा मध्य अमेरिकेतील ग्वातेमाला देशातील जागृत ज्वालामुखी आहे. हा ज्वालामुखी अँतिग्वा ग्वातेमाला शहरापासून १६ किमी पश्चिमेस आहे. जुलै २००४ ते जून २०१८ दरम्यान या ज्वालामुखीचे पाच विस्फोट झाले आहेत. जून २०१८ च्या स्फोटात अंदाजे ६२ व्यक्ती मृत्यू पावल्या होत्या.