Jump to content

व्हेरीकोज व्हेन्स

व्हेरिकोझ व्हेन्स किंवा डीव्हीटी हा पायांना होणारा आजार आहे. शिरांमधील व्हॉल्व्ह बाजूने काम करणे कमी करतात , त्यामुळे तिथला रक्तप्रवाह कमी होतो . व्हेन्स कालांतराने वेड्यावाकड्या दिसू लागतात. त्यानां व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. हे दोन्ही आजार पायांच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे म्हणजेच निलांचे आजार असून अत्यंत वेदनादायी आणि गुंतागुंतीच्या गंभीर आजार आहे. पायात रक्ताची गुठळी ज्या रक्तवाहिन्यांमध्ये होते,त्या निलांचा फुफ्फुसांशी अत्यंत जवळचा संबंध असतो. फुफ्फुसाकडे रक्त शुद्धीकरणासाठी घेऊन जाण्याची भूमिका या निला पार पाडत असल्याने या पायांतील रक्तवाहिन्यांमधील गुठळी जर वरच्या बाजूला सरकली, तर त्यामुळे एखाद्या फुफ्फुसातील रक्तवाहिनीत ब्लॉक होऊन व्यक्तीच्या फुफ्फुसातली रक्तशुद्धीकरणाची क्रियाच बंद होते.(पल्मोनरी एम्बोलिसम).

व्हेरीकोज व्हेन्सची कारणे

रक्तात रक्त पातळ ठेवणा-या घटकाची अनियमित पातळी असणे.

शारीरिक हालचालींचा अभाव असलेल्या व्यक्तीं

बराच काळ आजाराने हालचाली कमी झालेली व्येक्ती 

कोणत्याही ऑपरेशननंतर किंवा उपचारांनंतर

ओरल कॉण्ट्रासेप्टिव्ह्स घेणाऱ्या महिला 

वाढत्या वयाची व्येक्ती 

लठ्ठ व्यक्तींमध्ये किंवा 

एखादी जखम झाल्यानंतर 

हॉर्मोनल इम्बॅलन्स 

सतत लांब पल्ल्याचा प्रवास करने.

डीव्हीटी लक्षणे

-पायांच्या खोलवरच्या निलांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणे. 

-पायांना वेदना होऊ लागणे.

-पायात गोळे येणे. 

-पायाला सूज येणे.

-सतत पायाला खाज येणे. 

-अस्वस्थ वाटणे 

-खूप वेळ उभे किंवा बसल्यास पाय दुखणे. []

व्हेरिकोसी व्हेन टाळण्यासाठी

-वजनावर नियंत्रण ठेवणे, 

-प्रवास करताना पायांची जास्तीत जास्त हालचाल करीत राहणे, 

-पोटरीचे व्यायाम, घोट्याचे व्यायाम, व इतर व्यायाम करणे. 

-आराम करत असताना पाय उंचावर ठेवणे. 

-प्रत्येक एक दोन तासांनी कामात ब्रेक घेणे. 

-एका जागी जास्त वेळ उभे किंवा बसून राहू नये. 

-सोडियम कमी असलेले जेवण जेवावे. 

-उंच टाचांची पादत्राणे टाळणे. 

-वजनावर नियंत्रण ठेवणे. 

-दारु पिऊ नये,

-उन्हाळ्याच्या दिवसांत खूप पाणी पिणे,

-एका जागी बसल्या-बसल्यादेखील पायाचे व्यायाम करणे,

-खूप काळ पायाकपायचा तिढा करून बसू नये. 

व्हेरिकोस व्हेन टाळण्यासाठी काही व्यायाम प्रकार

  1. ^ "Yuvi Enterprise". Yuvi Enterprise. 2019-07-24 रोजी पाहिले.