व्हीआयपी गाढव (मराठी चित्रपट)
व्हीआयपी गाढव (मराठी चित्रपट) (२०१९) | |
---|---|
भाषा | {{{भाषा}}} |
प्रदर्शित | १३ संप्टेबर २०१९ |
कलाकार
- दिग्दर्शन- संजय यु पाटील
- निर्माता-कल्पराज क्ररिएशन प्रस्तुत
- कथा-डॉ.रणजीत सत्रे
- पटकथा-डॉ.प्रसन्न देवचरे
- प्रमुख कलाकार-भालचंद्र कदम ,विजय पाटकर, भारत गणेशपुरे , शितल अहिरराव ,
- गीत- प्रसिद्ध लावणीकवि बी. के. मोमीन ऊर्फ बशीर मोमीन (कवठेकर)
- संगित- अशोक वायंगणकर
व्हीआयपी गाढव
अवघ्या महाराष्ट्रातील कॉमेडी किंग अर्थात अभिनेता भाऊ कदम . उत्तम टाईमिंग मुळे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला नेहमीच खळखळून हसवले आहे. छोटया पडद्यावरील त्यांच्या अतिउत्तम कामगिरी मुळे ते पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘व्हीआयपी गाढव’ या कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित चित्रपटात अभिनेता भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असणार आहे.या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. ‘व्हीआयपी गाढव’ या नावावरून हा चित्रपट कॉमेडी असेल हे तुमच्या लक्षत आले असेल . ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके पॅटर्न या तिघांचा मेळ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट व्हयला लावणारा आहे. या चित्रपटाची कथा डॉ.रणजित सत्रे यांची असून पटकथा डॉ.प्रसन्न देवचके यांची आहे. शृंगारिक लावणी गीतांसाठी प्रसिद्ध असलेले लोकप्रिय कवि श्री बशीर मोमीन कवठेकर हे या चित्रपटाचे गीतकार आहेत. 'मुरली राजा', 'गंगाराम आला' अशी जुन्या पठडीतील तर 'झुंबा डान्स' सारखी आयटम नंबर या चित्रपटात असून अशोक वायंगणकर यांनी या चित्रपटाला संगीत दिला आहे.
शुटिंग
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढोकेश्वर टाकळी,माळकुप आणी गोरेगाव अश्या छोट्या गावांमध्ये या चित्रपटाचे संपूर्ण शुटींग झाले आहे. या चित्रपटात भाऊ कदम यांची प्रमुख भूमिका असून शितल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर ,पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी या कलाकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अस्सल गावरण मेवा आणि विनोदाचा ठेवा असा हा ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
.