व्ही.जी. वझे महाविद्यालय
व्ही.जी. वझे महाविद्यालय | |
---|---|
Principal | डॉ.बी.बी.शर्मा |
कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय(केळकर महाविद्यालय) |
कला,विज्ञान आणि वाणिज्य विनायक गणेश वझे महाविद्यालय | |
---|---|
केळकर कॉलेज | |
स्थापना | १९८४ |
प्रकार | खाजगी |
ठिकाण | मुलुंड(पूर्व), महाराष्ट्र, भारत |
संकेतस्थळ | vazecollege.net |
कला,विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे विनायक गणेश वझे महाविद्यालय मुलुंड पूर्व,मुंबई येथे स्थित आहे.केळकर संस्थेच्या विश्वस्त संस्थापकांच्या स्मरणार्थ १९८४ साली विनायक गणेश वझे स्थापना करण्यात आली.
इतिहास
भाऊसाहेब केळकर हे सुगंधी द्रव्ये निर्माण करणारे उद्योगपती होते.ते शैक्षणिक संस्थांना देणग्या देऊन आणि वंचित विद्यार्थ्यांना अनुदान देऊन शिक्षणास चालना देत होते. १९७९ साली महाविद्यालय स्थापन करण्यासाठी मुलुंड येथे केळकर शिक्षण संस्थेची स्थापना केली. केळकर-वझे कुटूंबातर्फे केळकर महाविद्यालयाची सुरुवात झाली होती.मुंबई विद्यापीठाशी महाविद्यालय लवकरच संलग्न झाले आणि लगेचच मुंबई महाविद्यापीठाशी महाविद्यालय कायमस्वरुपी संलग्न झाले
स्थान
मुंबईच्या ईशान्य उपनगरीय भागात,मुलुंड पूर्व येथील मिठानगर याभागात हे महाविद्यालय स्थित आहे.
संलग्नता आणि प्रमाणन
१९९० पासून महाविद्यालय हे मुंबई विद्यापीठाशी कायमस्वरुपी संलग्न आहे.नंतर यू.जी.सी. अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने(युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन) महाविद्यालयास मान्यता दिली.प्रथमतः केळकर महाविद्यालय महाराष्ट्रातील कला,विज्ञान आणि वाणिज्य संस्थाशी संलग्न होते,नंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने(यू.जी.सी.) सुरू केलेल्या NAAC म्हणजे राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेद्वारे महाविद्यालयाचे मूल्यमापन केले गेले.१९९८ मध्ये महाविद्यालयाने पंचतारांकित दर्जा प्राप्त केला.२००५ आणि २०१२मध्ये तिसऱ्यांदा करण्यात आलेल्या पुनर्मूल्यांकनात NAACद्वारे "अ " दर्जा (A) प्राप्त झाला.
अभ्यासक्रम
दुहेरी पदवी कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात विविध व्यावसायिक अभ्यासक्रम,पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम आणि सुधारित प्रमाणपत्र कार्यक्रम उपलब्ध आहेत.
- PhD(विद्यावाचस्पती) : अर्थशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवन विज्ञान(Life Sciences).
- पदव्युत्तर शिक्षण कार्यक्रम: संशोधनाद्वारे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण.
- लेखी परीक्षेद्वारे प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, माहिती तंत्रज्ञान(MSc IT), जैवतंत्रज्ञान(MSc Biotech)
- पदविका शिक्षण: वाणिज्य, कला आणि विज्ञान. सर्व १२२ विषयांच्या संयोजनात उपलब्ध.
- स्वयं अर्थपुरवठा सहयोग कार्यक्रम: सुगंधी द्रव्ये व सौंदर्य प्रसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र कार्यक्रम(Post graduate diploma in perfumery and cosmetic management)
विद्यार्थी परिषद
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ च्या कलम ४०(२) (ब) नुसार, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध वर्ग आणि नियमांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाविद्यालयाने २२नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची परिषद स्थापन करते.
महोत्सव
महाविद्यालयातर्फे दरवर्षी "डायमेन्शनस्" हा महोत्सव साजरा करण्यात येतो.साधारणतः डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. दरवर्षी एक विशिष्ट थीम (विषय) ठरवून त्यावर आधारित
अनेक सादरीकरणं असतात.
वर्ष | विषय(थीम) |
---|---|
२०१३ | बॅक टू इनोसन्स्(Back to Innocence) |
२०१४ | टुअर डी वर्ल्ड(Tour De World) |
२०१५ | द एज ऑफ् सुपरहिरोज् (Tour De World) |
२०१६ | द थेटर ऑफ् ड्रीम्स (The Theater of Dreams) |
२०१७ | कॉस्मिक उडाण (Cosmic Udaan) |
२०१८ | लुमोस (Lumos) |
२०१९ | पॅलेस ऑफ लॉस्ट थींग्ज (Palace Of Lost Things) |
तसेच महाविद्यालयात "ध्रुवा" हा संस्कृत महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवात अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थी कार्यक्रमातील स्पर्धांमध्ये सहभागी होतात. ह्या महोत्सवाची सुद्धा एक थीम असते.
प्रसिद्ध माजी विद्यार्थी
- अजिंक्य रहाणे , भारतीय क्रिकेट खेळाडू
- युक्ता मुखी, १९९९ची विश्वसुंदरी(Miss World 1999)
- तेजश्री प्रधान, मराठी अभिनेत्री
- मयुरी वाघ, मराठी अभिनेत्री
- पूर्वा गोखले, मराठी अभिनेत्री
- प्राजक्ता कोळी, प्रसिद्ध युट्यूबर व ब्लॉगर
- रुचा हसबनीस, हिंदी मालिकांतील अभिनेत्री
- मानसी साळवी, हिंदी मालिकांतील अभिनेत्री