व्हिम
व्हिम' हा एक संगंणकीय 'मजकुर संपादक' आहे (त्यापूर्वीच्या 'अतारी एस टी'च्या टिम् थाँम्प्सन्, टोनी ऍण्ड्र्यूज आणि जी. आर. (फ्रेड) वॉल्टर यांनी तयार केलेल्या 'स्टेव्ही' नावाच्या संपादकावर आधारित), जो १९९१ मध्ये ब्राम मूलेनार ने अमिगा कंप्युटर साठी वितरित केला. व्हिम हे "व्ही आय इम्प्रूव्ह्ड"च संक्षिप्त रूप आहे, कारण व्हिम हा व्हीआयची सुधारित आव्र्त्ती आहे, ज्याच्यात संगंणकीय आज्ञावलींचे संपादन करण्यासाठी विशेष बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीस 'व्हिम' हे "व्ही आय इमिटेशन (व्ही आयची नक्कल)"चे संक्षिप्त रूप होते, परंतू, डिसेंबर १९९३ मध्ये, व्हिम २.० च्या अनावरणानंतर ते बदलण्यात आले. व्हिमची वैशिष्ट्ये ही व्ही आयपेक्षा खूप पुढारलेली असल्यामुळे हा बदल करण्यात आला, असे र्यानंतरच्या एका टिप्पणीत म्हणले आहे.