व्हरमाँट (इंग्लिश: Vermont) हे अमेरिकेच्यान्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. व्हरमाँट हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४५वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४९व्या क्रमांकाचे राज्य आहे. माँतपेलिए ही व्हरमाँटची राजधानी असून बर्लिंग्टन हे सर्वात मोठे शहर आहे.