Jump to content

व्लादिस्लाव दुसरा, बोहेमिया

व्लादिस्लाव दुसरा (इ.स. १११० - जानेवारी १८, इ.स. ११७४) बोहेमियाचा दुसरा राजा होता.

हा व्लादिस्लाव पहिल्याचा मुलगा व बोहेमियाचा पहिला राजा सोबेस्लाव पहिला याचा पुतण्या होता. राजाचा मुलगा नसल्यामुळे आपले नशीब अजमावण्यासाठी तो बव्हारियाला गेला व सोबेस्लावच्या मृत्युनंतर परतला. आपल्या मेव्हण्याच्या (जर्मनीचा राजा कॉनराड तिसरा) मदतीने त्याने स्वतःला युवराज करून घेतले.

जानेवारी ११, इ.स. ११५८ रोजी जर्मनीचा नवीन राजा फ्रेडरिक बार्बरोसाच्या मदतीने तो बोहेमियाचा राजा झाला. इ.स. ११७८मध्ये त्याने आपल्या मुलाला (बोहेमियाचा फ्रेडरिक) राजा होता यावे यासाठी पदत्याग केला. फ्रेडरिकने एका वर्षात राज्य सोडले व सोबेस्लाव दुसरा राजा झाला. त्याने व्लादिस्लावला बोहेमियातून हाकलून दिले.