Jump to content

व्योमगंगा

व्योमगंगा हे देवप्रियाचे मूळ वृत्त आहे.

उर्दू छंदशास्त्रात याला बहर-ए-रमल असे म्हणतात. यामध्ये चार खंड असून प्रत्येक खंडात ४ अक्षरे व ७ मात्रा असतात.

याचा लघुगुरू आणि मात्रांचा क्रम असा आहे :

गा ल गा गागा ल गा गागा ल गा गागा ल गा गा
२ १ २ २२ १ २ २२ १ २ २२ १ २ २

उदाहरणे

१)

   मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
   मोकळ्या केसात माझ्या, तू जिवाला गुंतवावे
    ~ सुरेश भट

२)

  चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यांत पाणी?
  सोड त्याचे बोलणे तो, एक वेडापीर होता..
  काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा?
  काय माझ्याहून माझा हुंदका खंबीर होता?
   ~ सुरेश भट

३)

   एकटा आहे कुठे मी? एकटा होतो कधी मी?
   फौज मागे राबणाऱ्यांची उभी झुंजार आहे
    ~ सुरेश भट