व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह
व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह | |
सोव्हिएत संघाचे प्रधानमंत्री | |
कार्यकाळ १९ डिसेंबर १९३० – ६ मे १९४१ | |
मागील | अलेक्सेई रायकोव |
---|---|
पुढील | स्टॅलिन |
सोव्हिएत परराष्ट्रमंत्री | |
कार्यकाळ ३ मे १९३९ – ४ मार्च १९४९ | |
जन्म | ९ मार्च १८९० सोवेत्स्क, रशियन साम्राज्य |
मृत्यू | ८ नोव्हेंबर, १९८६ (वय ९६) मॉस्को, रशियन सोसासंप्र |
राजकीय पक्ष | सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष |
धर्म | नास्तिक |
सही |
व्याचेस्लाव्ह मोलोतोव्ह (रशियन: Вячеслав Молотов; ५ डिसेंबर १८६७ - १२ मे १९३५) हा एक सोव्हिएत राजकारणी व जोसेफ स्टॅलिनचा निकटचा सहकारी होता. तो १९३० च्या शतकादरम्यान सोव्हिएत संघाचा प्रमुख तर १९३९ ते १९४९ दरम्यान परराष्ट्रमंत्री होता.
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोव्हिएत व नाझी जर्मनी ह्यांच्या दरम्यान झालेल्या गुप्त करारामध्ये मोलोतोव्हने सहभाग घेतला होता. मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार ह्या नावाने मोलोतोव्ह व नाझी परराष्ट्रमंत्री योआखिम फॉन रिबेनट्रॉप ह्यांच्यामध्ये झालेल्या ह्या करारामध्ये पोलंड देशाचे विभाजन व एकमेकांवर अनाक्रमणाचे वचन दिले गेले होते.
युद्ध संपल्यानंतर मोलोतोव्हचे सोव्हिएतमधील महत्त्व कमी झाले. स्टॅलिनच्या मृत्यूनंतर मोलोतोव्हने स्टॅलिनच्या धोरणांचा पाठिंबा चालू ठेवला. तो निकिता ख्रुश्चेव्हच्या राजवटीचा मोठा टीकाकार होता.
बाह्य दुवे
- व्यक्तिचित्र Archived 2018-09-17 at the Wayback Machine.