व्यतिपात
जेव्हा चंद्रक्रांती आणि सूर्यक्रांती मापाने सारख्याच असतात तेव्हा 'पात' धरतात. चंद्र आणि सूर्य जेव्हा एकाच बाजूस असतात, तेव्हा व्यतिपात होतो आणि जेव्हा विरुद्ध बाजूस असतात तेव्हा वैधृतिपात होतो.[१] [२][३]
ज्या वेळेस 'पात' होतो त्या वेळेपासून क्रांतीमध्ये मागे अर्धा अंश व पुढे अर्धा अंश अंतर पडण्यास जो वेळ लागतो, त्या वेळा सूर्योदयानंतरच्या काढून मांडतात. पहिल्या काळाला प्रवृत्ती आणि दुसऱ्या काळाला निवृत्ती असे नाव आहे.[४]
पंचांगात पाताचा वेळ दिलेला नसतो. पात नेहमी संक्षिप्त रूपाने दिलेला असतो. उदा० व्य.पा.प्र., व्य.पा.नि. वगैरे. पात हा काळ शुभ कार्यास वर्ज्य करावा असा शास्त्रसंकेत आहे.
संदर्भ
- ^ "Vyatipata Yoga व्यतिपात योग शुभाशुभ विचार 2020". 24 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "व्यतिपात योग: ये 4 राशि वाले भूलकर भी न करें दूसरों का नुकसान". punjabkesari. 24 मे 2020 रोजी पाहिले.
- ^ "व्यतिपात योग की महिमा जानकर हैरान हो जायेंगे आप". 24 मे 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "व्यतिपात योग: किन राशियों के लिए अच्छा नहीं है बुधवार". Dainik Bhaskar (हिंदी भाषेत). 24 मे 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]