व्यक्ती
व्यक्ती ही एखाद्या मानवास संबोधणारी संज्ञा आहे.
श्रीमत् भगवत गीतेतील अध्याय पहिला, श्लोक २८ मधे या अवस्थेचे वर्णन आहे. तो श्लोक असा,
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥२८॥
हे सारे जीव पूर्वी अव्यक्त होते, त्यांची मधली अवस्था व्यक्त आहे व मरणानंतर ते पुन्हा अव्यक्तात जातात. मग त्याकरता हे भारता, चिंता कशाला?
आशय असा की पूर्वी म्हणजे जन्मापूर्वी जीव डोळ्यांना दिसत नाही म्हणजे तो अव्यक्त असतो, जन्माच्या वेळी तो शरीर धारण करतो जे डोळ्यांना दिसते व मरताना तो ते जड शरीर सोडून जातो व परत अव्यक्त अवस्थेत असतो. या अव्यक्त अवस्थेला अध्यात्मात जीवात्मा म्हणतात.
शरीराद्वारे जीवात्मा व्यक्त अवस्थेत येत असल्याने मानवी शरीराला व्यक्ती अशी संज्ञा दिली गेली आहे. या शरीर म्हणजे देहाचे आणि देहिन म्हणजे जीवात्म्याचे अधिक वर्णन पुढील श्लोकात आले आहे,
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥१३॥
कौमार्य, यौवन व जरा म्हणजे वृद्ध या अवस्था देहाला आहेत, देहिन म्हणजे जीवात्म्याला नाहीत. म्हणून देहांतर झाल्यानंतर धीर पुरुष मोहीत होत नाहीत.
व्यक्तित्व, व्यक्तिमत्व, व्यक्तिशः, व्यक्तिगत, इत्यादी नामरुपे व्यक्ति या शब्दाची आहेत.