Jump to content

व्यंकटेशस्तोत्र

[ संदर्भ हवा ]व्यंकटेशस्तोत्र हे महाराष्ट्रातील अनेक घरांत नित्यनियमाने वाचले जाणारे एक स्तोत्र आहे. याचा कर्ता कुणी 'देवीदास' नावाचा आहे, असा उल्लेख स्तोत्रामध्येच आहे.

मराठी भाषकाच्या बोलण्यात जी सहजपणे येतात अशा कमीत कमी चार सुप्रसिद्ध मराठी वचनांचा उगम व्यंकटेशस्तोत्रात आहे. ती वचने अशी :-

  1. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद - श्लोक १३.
  2. उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे - श्लोक १४
  3. समर्थाघरचे श्वान - श्लोक १७
  4. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा - श्लोक २२.