व्यंकटेश आत्राम
* संशोधक व्यंकटेश आत्राम *
( जन्म :१५ जानेवारी १९४३ - मृत्यु :०२ आँक्टोबर १९८७)
व्यंकटेश आत्राम यांचा जन्म शुक्रवार दि.१५ जानेवारी १९४३ रोजी किरजवळा , ता.चांदूर जि.अमरावती .येथे झाला .त्यांच्या वडिलांचा मृत्यु व्यंकटेश आत्राम हे अवघे चार वर्षांचे असतांनाच झाला होता. त्यामुळे त्यांची आई रेशमाबाई यांनी त्यांना प्राथमिक शाळेमध्ये दाखल केले. ते अमरावती येथील जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेमध्ये एस. एस. सी पर्यंत शिकवले. त्यानंतर त्यांनी बी. ए. केले आणि ४ जून १९६८ला अमरावती येथील गोविंदराव उईके यांची मुलगी यशोदाताई सोबत विवाह झाला. व्यंकटेश आत्राम हे असे लेखक, साहित्यकार, इतिहासकार,संशोधक होते की, त्यांनी जगाला भारताचे बहुजन मूलनिवासी आदिवासी कोण आहेत यांचा परिचय करून दिला आहे. अशा महत्त्वपूर्ण साहित्याची न भूतोना भविष्यतो अशी व्यंकटेश आत्राम यांनी निमिर्ती केली. व्यंकटेश आत्राम यांची लहानपणा पासूनच चिकित्सक वृत्ती होती व त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोण हा संशोधक होता. गोंडाची उत्पत्ति, त्यांची बोली भाषा, त्यांचे सामाजिक जीवनस्तर, त्यांची संस्कृती, त्यांचा इतिहासावर ते नेहमी विचार करत होते. त्यांची तर्कशक्ती ऐवढी होती की, सगळ्या भाषेची जननी ही संस्कृत भाषा नसून ती कोयतूर लोकांची भाषा गोंडी भाषा आहे. त्यांना नेहमी वाटत होते की गोंड समाजाच्या इतिहासाची व संस्कृतीची लोकांना नेहमी स्मरण ठेवून या बाबतची माहिती इतर समाज बांधवास व्हावी. म्हणून ते गावा गावात पैदल फिरत होते. अशा निस्वार्थी समाज सेवा करणाऱ्या सेवकाला, साहित्यकाला, संधोधकाला महाराष्ट्र शासनाने १४ ऑगस्ट १९८५ला आदिवासी सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
व्यंकटेश आत्राम हे बी. एस. पी. सारख्या राजकीय राष्ट्रीय पक्षात कार्यरत होते आणि शेवटपर्यंत या राजकीय पक्षात राहून त्यांनी पक्षसेवेच कार्य केले. व्यंकटेश आत्राम हे यांचे आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते होते. ते आंबेडकरवादाचे खंदे पुरस्कर्ते म्हणून वावरले. ते फार मोठे महान आंबेडकरवादी होते. पुढे त्यांनी आदिवासींच्या जीवन संस्कृतीचा सखोल अभ्यास करून अनेक लेख प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी ऐतिहासिक तथ्ये हुडकून काढली. "गोंडी भाषेचे प्राचीनत्व ", " परधानांचा शिमगा - फाग","परधानांचा लग्नोत्सव "आणि "भारतीय वास्तुशिल्पे आणि गोंड संस्कृती"हे त्यांचे गाजलेले लेख. ते नागपूर विद्यापीठात सिनेट सदस्य असतांना स्नातक स्तरावर गोंडी भाषेचा स्वतंत्र पेपर असावा असा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. यावरून गोंडी संस्कृतीवर त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेम दिसून येते. परिवारीक, सामाजिक आणि राजकीय व्याप सांभाळून ते लेखन कार्य करायचे. त्यातूनच त्यांची 'दोन क्रांतिवीर 'हे ऐतिहासिक पुस्तक १८ सप्टेंबर १९६८ला प्रसिद्ध केले आणि "गोंडी संस्कृतीचे संदर्भ " हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले हे पुस्तक त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या जन्मदिनी १५ जानेवारी १९८९ला आंबेडकरी चळवळीने प्रकाशित केले. पुन्हा ह्या पुस्तकांनी त्यांच्या कार्यात मोलाची भर पडली. याचप्रमाणे ते आंबेडकरी चळवळीत असतांना "आदिवासी व आदिवासी समाज आणि आंबेडकरी चळवळ: समज आणि गैरसमज "हे पुस्तक १९८७ मध्ये प्रकाशित केले.
व्यंकटेश आत्राम केवळ लिखान वाचन करून थांबले नाहीत तर त्यांनी आदिवासींना वाचनाची आवड निर्माण व्हावी या करिता वर्धा येथे"राहुड वाचनालय",१९७९ मध्ये अमरावती येथे " जयसेवा वाचनालय " स्थापन केले. त्यांनी आदिवासीमध्ये वैचारिक जागृती आणण्याकरिता १९८४ साली जंगोराईताड नावाचे पाक्षिक गोंडी साहित्य प्रकाशनार्थ सुरू केले. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ते बंद करावे लागले. अशा महान इतिहासकारांचा अल्पशा आजाराने विजया दशमी या दिवशी इर्विन हॉस्पीटल अमरावती येथे दिनांक २ ऑक्टोंबर १९८७ रोजी मध्यरात्री १.१० वाजता दुःखद निधन झाले.
संदर्भ
आदिवासी अर्थात मूलनिवासी महानायक
लेखक :- राजदीप आगळे