Jump to content

वोल्गोग्राद

वोल्गोग्राद
Волгоград
शहर

चित्र:VLG collage.jpg

ध्वज
चिन्ह
वोल्गोग्राद is located in रशिया
वोल्गोग्राद
वोल्गोग्राद
वोल्गोग्रादचे रशियामधील स्थान

गुणक: 48°42′N 44°31′E / 48.700°N 44.517°E / 48.700; 44.517

देशरशिया ध्वज रशिया
राज्य वोल्गोग्राद ओब्लास्त
स्थापना वर्ष १५५५
क्षेत्रफळ ८५९ चौ. किमी (३३२ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १०,२१,२१५
  - घनता १,१८५ /चौ. किमी (३,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००)
http://www.volgadmin.ru


वोल्गोग्राद (रशियन: Волгоград; भूतपूर्व नावे: झारित्सिन (१५८९ - १९२५) व स्टालिनग्राड (१९२५ - १९६१)) ही रशिया देशाच्या वोल्गोग्राद ओब्लास्ताचे राजधानी व रशियामधील एक महत्त्वाचे औद्योगिक शहर आहे. वोल्गा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले वोल्गोग्राद लोकसंख्येच्या दृष्टीने रशियामधील १२व्या क्रमांकाचे शहर असून २०१० साली येथील लोकसंख्या १०,११,४१७ (इ.स. २००२ जनगणनेनुसार) आहे. इ.स. १५८९ ते इ.स. १९२५ या कालखंडात या शहराचे नाव त्सारित्सिन असे होते, तर इ.स. १९२५ ते इ.स. १९६१ या काळात जोसेफ स्टालिन याच्या नावावरून ठेवलेल्या स्तालिनग्राद या नावाने ते ओळखले जाई.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीसोव्हिएत संघादरम्यान झालेल्या अत्यंत विध्वंसक लढाईसाठी स्टालिनग्राड इतिहासामध्ये ओळखले जाते. २३ ऑगस्ट १९४२ रोजी नाझी जर्मनीने प्रचंड मोठा बाँबहल्ला करून जवळजवळ पूर्ण स्टालिनग्राड शहर बेचिराख केले. त्यानंतर ह्या शहराचा ताबा मिळवण्यासाठी झालेली लढाई आजवरची सर्वात रक्तरंजित लढाई मानली जाते. नोव्हेंबर १९४२ मध्ये शहराच्या ९० टक्क्याहून अधिक भागावर नियंत्रण मिळवल्यानंतरदेखील जर्मनीला संपूर्ण लाल सैन्य येथून हुसकावून लावण्यात यश आले नाही. १८ नोव्हेंबर १९४२ रोजी सोव्हिएतने सुरू केलेल्या प्रतिहल्ल्यादरम्यान जर्मनीचे जवळजवळ सर्व सहावे सैन्य एकाकी पडले व सोव्हिएत संघाने ही लढाई जिंकली. ह्या लढाईमध्ये १२.५ ते १८ लाख सैनिक मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज आहे.

इ.स. १९६१ साली राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्हने ह्या शहराचे नाव बदलून वोल्गोग्राद असे ठेवले.

बाह्य दुवे