वॉशिंग्टन स्मारक
वॉशिंग्टन स्मारक अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. शहरातील इमारत आहे. अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनच्या स्मरणार्थ बांधलेली ही इमारत १६९.२९४ मीटर (५५५ १/८ फूट) उंचीची आहे.
डी.सी.च्या नॅशनल मॉल भागात असलेल्या या इमारतीचे बांधकाम इ.स. १८४८साली सुरू झाले. १८५४ ते १८७७ दरम्यान ही इमारत अर्धवट बांधलेल्या अवस्थेत पडून होती. १८८४मध्ये बांधकाम पूर्ण होउन १८८५मध्ये हिचे उद्घाटन करण्यात आले. १८८८साली याच्या आतील भागाची बांधणी व इतर सुशोभन पूर्ण करण्यात आले.