वॉरेन वॉशिंग्टन
वॉरेन वॉशिंग्टन (२८ ऑगस्ट, १९३६: पोर्टलँड, ओरेगॉन, अमेरिका - ) हे अमेरिकन हवामान शास्त्रज्ञ असून ते सध्या नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फिअरिक रिसर्च, बोल्डर, कॉलोराडो येथे वयाच्या ८३ व्या वर्षीही कार्यरत आहेत.[१]
जन्म व शिक्षण
वॉरेन वॉशिंग्टन यांचा जन्म २८ ऑगस्ट १९३६ला अमेरिकेतील पोर्टलँड, ओरेगॉन, येथील आफ्रिकन-अमेरिकन कुटुंबात झाला. वॉशिंग्टन यांनी ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीतून भौतिकशास्त्रात पदवी व हवामानशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी मधून १९६४ साली हवामानशास्त्रात पीएच.डी मिळवली.
कार्य
पर्यावरण विज्ञान व हवामान संशोधन या विषयांत डॉ. वॉशिंग्टन तज्ञ आहेत व पृथ्वीचे हवामान व त्याची कॉम्प्युटर सिम्युलेशन मॉडेल्स बनवणे या विषयांत त्यांचा खास अभ्यास आहे. वॉशिंग्टन यांनी अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पर्यावरण विषयक सल्लागार म्हणून काम केले आहे. टोकाच्या पर्यावरणीय घटनांचा संबंध व त्यांची वाढण्याची शक्यता वॉशिंग्टन यांची मॉडेल्स स्पष्ट करतात. हवामानशास्त्रातील हा महत्त्वाचा विकासाचा टप्पा वॉशिंग्टन यांच्या संशोधनामुळे शक्य झाला आहे.
पुरस्कार
वॉरेन वॉशिंग्टन यांना २००७ साली शांततेचे नोबेल पारितोषिक आयपीसीसीच्या इतर शास्त्रज्ञांबरोबर विभागून देण्यात आले. २०१० मध्ये अमेरिकेतले विज्ञान क्षेत्रातले सर्वोच्च ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ दिले गेले.[२]२०१९ मध्ये पर्यावरण क्षेत्रातील नोबेल मानला जाणारा टायलर पुरस्कार वैज्ञानिक मायकेल मॅन यांच्याबरोबर विभागून देण्यात आला.[३]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "VITA - WARREN M. WASHINGTON" (PDF). http://www.cgd.ucar.edu. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "NEW WARREN WASHINGTON MEDAL TO BE AWARDED BY AMS". https://news.ucar.edu. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "THE TYLER PRIZE FOR ENVIRONMENTAL ACHIEVEMENT 2019" (PDF). https://tylerprize.org. १० मार्च २०२० रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)