Jump to content

वॉटर पोलो

वॉटर पोलो खेळताना संघ

वॉटर पोलो (इंग्रजी:Water Polo) हा पाण्यात खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. या खेळाची सुरुवात १९९व्या शतकात इंग्लंड येथे झाली. हा खेळ महिला व पुरुष दोन्ही व्यक्ती खेळतात. यात दोन संघ एका वेळी खेळतात. एका संघात ७ खेळाडू असतात. प्रत्यक्षात ६ खेळाडू खेळतात तर एक चेंडू अडवणारा गोलकीपर असतो. महाराष्ट्रात डेक्कन जिमखाना ही संस्था राज्यस्तरीय जलतरण आणि वॉटर पोलो स्पर्धेचे आयोजन करते. तसेच जिल्हा ऍम्युच्युअर ऍक्वॉटीक असोसिएशन धुळे ही संस्थाही राज्यस्तरीय जलतरण व वॉटर पोलो स्पर्धा आयोजित करत असते.[ संदर्भ हवा ]

वॉटर पोलोच्या खेळामध्ये रणनीतिक विचार आणि जागरूकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहेत. वॉटर पोलो हा एक शारीरिक आणि खेळण्यासाठी कठीण खेळ म्हणून उल्लेख केला जातो.

हा खेळ १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्कॉटलंडमध्ये "वॉटर रग्बी" म्हणून ओळखला गेला असे मानले जाते. विल्यम विल्सन यांनी या खेळात विकास केला. हा खेळ लंडन वॉटर पोलो लीगच्या स्थापनेने विकसित झाला आणि युरोप, अमेरिका, ब्राझील, चीन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासह जगभरातील विविध ठिकाणी लोकप्रिय होत गेला.

इतिहास

१९  व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लैंड आणि स्कॉटलंडमध्ये जलतरण कौशल्य म्हणून एक वॉटर पोलो  संघाचा खेळ सुरू झाला, जेथे वॉटर स्पोर्ट्स आणि रेसिंग प्रदर्शन काउंटी मेळ्या आणि उत्सवांचे वैशिष्ट्य होते.[ संदर्भ हवा ]