Jump to content

वैष्णोदेवी

वैष्णोदेवी मंदिर

वैष्णोदेवी (उत्तरेकडील प्रचलित नाव: मातारानी) हा हिंदू धर्मामधील दुर्गा ह्या देवीचा एक अवतार समजला जातो. भारताच्या हिमालय पर्वतरांगेमध्ये स्थित असलेले वैष्णोदेवी मंदिर हिंदू धर्मामधील एक लोकप्रिय मंदिर आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकूट पर्वतरांगेमधील ह्या मंदिराला दरवर्षी १ कोटी भाविक भेट देतात.

वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी कटरा ह्या गावापासून १२ किमी अंतराचा घाट पायी चढावा लागतो. कटरा गाव जम्मूपासून ४५ किमी अंतरावर असून ते काश्मीर रेल्वेमार्गाद्वारे जम्मू तावीसोबत जोडले गेले आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे