वैष्णव जन तो
वैष्णव जन तो हे एक प्रसिद्ध गुजराती हिंदू भजन आहे , कवी नरसी मेहता यांनी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात ते लिहिले .[१]
हे भजन गुजराती भाषेत लिहिले गेले आहे. हे भजन वैष्णव जनांचे (विष्णू देवाचे उपासक व पूजक यांचे) गुण व त्यांची लक्षणे सांगते .
प्रसार
ह्या भजनाचा समावेश महात्मा गांधींच्या रोजच्या प्रार्थनेमध्ये असल्याने हे भजन लोकप्रिय झाले आहे. महात्मा गांधी यांनी अंगिकारलेल्या जीवन आणि कार्य तत्त्वज्ञानाचे वर्णन या भजनात आहे.[२] त्यामुळे महात्मा गांधी यांच्या राष्ट्रकार्याचे स्मरण करताना या भजनाचा समावेश केला जातो.
गीतिकाव्य
मूळ गुजराती | देवनागरी |
---|---|
|
|
मराठी भाषांतर
मूळ काव्य (देवनागरीत) | मराठी (भाषांतरित) |
---|---|
वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे, | वैष्णव जन त्यांना म्हणावे जे परकियांच्या पिडा जाणतात |
पर दुःखे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे ॥ | जे दुसऱ्यांचे दुःख दूर करून देखील अभिमान मनात आणत नाही |
सकल लोकमां सहुने वंदे निंदा न करे केनी रे, | जे लोकांना (जनमानसांना ) वंदितात आणि कुणाची ही निंदा करीत नाहीत |
वाच काछ मन निश्चल राखे धन धन जननी तेनी रे ॥ | वचन , कर्म , मन जे निश्चल राखतात , त्यांची जननी धन्य धन्य आहे |
समदृष्टि ने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे, | तृष्णा (लोभ) त्यागून जे सर्वांना समभावाने बघतात , पर-स्त्री ज्यांना माते समान (आई) आहे |
जिह्वा थकी असत्य न बोले, परधन नव झाले हाथ रे ॥ | जिह्वा (जीभ ) थकली तरी जे असत्य बोलत नाहीत , परधनास (दुसऱ्यांच्या धनास ) जे स्पर्श करत नाहीत |
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ़ वैराग्य जेना मनमां रे, | मोह माया ज्यांना व्यापत नाही , दृढ वैराग्य ज्यांच्या मनात आहे |
रामनाम शुं ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे ॥ | राम-नामामध्ये जे तल्लीन आहेत ,जणू तीर्थ ज्यांच्या तनात (शरीरात) वसले आहे |
वणलोभी ने कपटरहित छे, काम क्रोध निवाऱ्या रे, | लोभापासून दूर होऊन कपटरहित ज्यांनी ,काम-क्रोधाचे निवारण केले आहे |
भणे नरसैयॊ तेनु दरसन करतां, कूल एकोतेर ताऱ्या रे ॥ | कवी नरसिंह अशा लोकांचे (वैष्णवांचे) दर्शन घेण्यासाठी अभिलाषी आहे , जे एकूण कुळाचे तारण करतात (मोक्ष मिळवून देतात) |
संदर्भ आणि नोंदी
- ^ Verma, Shyam Bahadur (2009-01-01). Brhat Visva Sukti Kosa-III (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-81-7315-170-5.
- ^ Gandhi, Mahatma (2016). Merī ātmakathā: satya ke mere prayoga (हिंदी भाषेत). Kalpanā Prakāśana. ISBN 978-93-83725-83-0.