वैशाली येडे
वैशाली येडे या ९२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक होत्या. त्यांची उद्घाटक म्हणून निवड अखिल भारतीय साहित्य महामंडळाने केली.त्यांचे वय अठ्ठावीस वर्षे आहे.[१]
इतिहास
त्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील राजूरा या गावच्या रहिवासी आहेत.त्यांच्या पतीने सात वर्षांपूर्वी सन २०११ मध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना अनेक वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले.तशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी आपला जीवनसंघर्ष सुरू ठेवला. त्यांना दोन अपत्ये आहेत.[२]
त्या राजूरा गावात अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी तेरवं या नाटकात भूमिका केली आहे.हे नाटक त्यांच्या जीवनकहाणीवर आधारीत आहे.
संदर्भ
- ^ लोकमत न्यूझ नेटवर्क. "आत्महत्याग्रस्त शेतकरी महिलेला साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान;सोहळ्यावरील वादाचे मळभ दूर". १३ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी उद्घाटक". १३-०१-२०१९ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)