Jump to content

वैशाख

१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

वैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.

सूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.

वैशाख महिन्यातील सण

  • वैशाख शुद्ध तृतीया-अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती.
  • वैशाख शुद्ध पंचमी-आद्य शंकराचार्य जयंती, रामानुजाचार्य जयंती, सूरदास जयंती..
  • वैशाख शुद्ध अष्टमी -बगलामुखी जयंती
  • वैशाख शुद्ध चतुर्दशी (नृसिंह चतुर्दशी)-नृसिंह जयंती; छिन्नमस्ता जयंती.
  • वैशाख पौर्णिमा-बुद्ध पौर्णिमा; भृगु जयंती,
  • वैशाख कृष्ण प्रतिपदा-नारद जयंती.
  • वैशाख अमावस्या-शनैश्चर जयंती.

कालबैसाखी

पश्चिम बंगाल-बांगलादेश या भागांत ग्रीष्म ऋतूतील वैशाख महिन्यात पडणाऱ्या वादळी पावसाला कालबैसाखी म्हणतात.

टोपणनाव

  • वैशाख हे त्र्यं.वि. देशमुख नावाच्या मराठी कवीचे टोपणनाव आहे.
हिंदू पंचांगानुसार बारा महिने
  वैशाख महिना   →
शुद्ध पक्षप्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा
कृष्ण पक्षप्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या