वैवस्वत मन्वंतर
ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये (कल्पामध्ये) ४३२ कोटी सौरवर्षे(मानवी वर्षे) होतात. त्या दिवसामध्ये चौदा मन्वंतरे होतात. एका मन्वंतरामध्ये ७१ महायुगे होतात. प्रत्येक मन्वंतर संपल्यानंतर दुसरे सुरू होण्यापूर्वी मध्ये एका कृतयुगाएवढा(१७,२८,००० वर्षांचा) संधिकाल असतो. असे तेरा संधिकाल असून, नवीन कल्प सुरू होण्यापूर्वी असणारा एक चौदावा संधिकाल असतो. सध्या चालू असलेल्या स्वेतवाराह कल्पामधली संधिकालांसह सहा मन्वंतरे होऊन गेली आहेत आणि सातवे वैवस्वत मन्वंतर चालू आहे. मन्वंतरातील २७ महायुगे पूर्ण होऊन २८वे महायुग चालू आहे. या अठ्ठाविसाव्या महायुगातली कृत(=सत्य), त्रेता, द्वापार ही तीन युगे संपून सध्या कलियुग चालू आहे. इ.स.२०23 सालापर्यंत कलियुगातली ५,१24 वर्षे पूर्ण होऊन ५,१25वे वर्ष चालू आहे.
१४ मन्वंतरांची नावे
- स्वायंभुव * स्वारोचिष * उत्तम * तामस * रैवत * चाक्षुष * वैवस्वत(चालू मन्वंतर) * सावर्णि * दक्षसावर्णि * ब्रह्मसावर्णि * धर्मसावर्णि * रुद्रसावर्णि * रौच्य आणि * भौत्य. (काही पंचांगांत रौच्य आणि भौत्य या नावांऐवजी देवसावर्णि आणि इंद्रसावर्णि अशी नावे दिलेली असतात.)