वैजापूर विधानसभा मतदारसंघ
वैजापूर विधानसभा मतदारसंघ - ११२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, वैजापूर मतदारसंघात औरंगाबाद जिल्ह्यातील १. वैजापूर तालुका आणि २. गंगापूर तालुक्यातील मांजरी आणि सिद्धनाथ वडगांव ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. वैजापूर हा विधानसभा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
शिवसेनेचे रमेश नानासाहेब बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | रमेश नानासाहेब बोरनारे | शिवसेना | |
२०१४ | भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | आर.एम. वणी | शिवसेना |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
वैजापूर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
आर.एम. वाणी | शिवसेना | ५१३७९ |
भाऊसाहेब रामराव पाटील | अपक्ष | ५०१५४ |
दिनेशभाऊ परदेशी | काँग्रेस | ३९५५७ |
आबा कैलासराव रामराव पाटील | अपक्ष | १४७०८ |
प्रभाकर ठकाजी पगारे | बसपा | ३९०८ |
प्रशांत दादासाहेब सदाफळ | मनसे | २९०८ |
सुनील आसाराम घोलप | अपक्ष | २५४० |
TRIBHUVAN SANJAY DADA | रिपाई (A) | १०२९ |
ANSAR GULAB MANSURI | अपक्ष | ६७२ |
NAVANATH NAMDEV ADHAV | प्ररिप | ६३१ |
KOLSE SHARADKUMAR FAKIRA | अपक्ष | ५३२ |
NIPATE KESHAV BHAVRAO | अपक्ष | ५२१ |
संदर्भ
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर वैजापूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै २०१३ रोजी पाहिले.