वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२ याच्याशी गल्लत करू नका.
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२१-२२ | |||||
पाकिस्तान महिला | वेस्ट इंडीज महिला | ||||
तारीख | ८ – १४ नोव्हेंबर २०२१ | ||||
संघनायक | जव्हेरिया खान (२रा,३रा म.ए.दि.) सिद्रा नवाझ (१ला म.ए.दि.) | स्टेफनी टेलर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुनीबा अली (१०३) | डिआंड्रा डॉटिन (१७०) | |||
सर्वाधिक बळी | अनाम अमीन (९) | हेली मॅथ्यूस (७) | |||
मालिकावीर | हेली मॅथ्यूस (वेस्ट इंडीज) |
वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२१ दरम्यान पाकिस्तानचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्ये झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. वेस्ट इंडीज महिलांनी मार्च २००४ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये महिला वनडे सामने खेळले.
मालिका सुरू व्हायच्या आधी पाकिस्तानी संघाच्या कर्णधारसहित ५ पाच खेळाडूंना कोव्हिड-१९ रोगाची लागण झाली. त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी पीसीबी ने सिद्रा नवाझकडे पाकिस्तानचे कर्णधारपद सोपविले. वेस्ट इंडीजने तिनही सामने जिंकत मालिकेत ३-० असा विजय मिळवला.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
८ नोव्हेंबर २०२१ धावफलक |
वेस्ट इंडीज २५३/८ (५० षटके) | वि | पाकिस्तान २०८/९ (५० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
२रा सामना
११ नोव्हेंबर २०२१ धावफलक |
वेस्ट इंडीज १५३ (४५.४ षटके) | वि | पाकिस्तान ११६ (३९.२ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान महिला, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
१४ नोव्हेंबर २०२१ धावफलक |
पाकिस्तान २२५/७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २२६/४ (४४ षटके) |
मुनीबा अली ५८ (८८) शकेरा सलमान २/४० (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
साचा:आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे