वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२१-२२ | |||||
दक्षिण आफ्रिका महिला | वेस्ट इंडीज महिला | ||||
तारीख | २८ जानेवारी – ६ फेब्रुवारी २०२२ | ||||
संघनायक | सुने लूस | स्टेफनी टेलर (१ला-३रा म.ए.दि.) अनिसा मोहम्मद (५वा म.ए.दि.) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | दक्षिण आफ्रिका महिला संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लॉरा वॉल्व्हार्ड (१७१) | डिआंड्रा डॉटिन (२३५) | |||
सर्वाधिक बळी | शबनिम इस्माइल (१०) आयाबोंगा खाका (१०) | शमिलिया कॉनेल (७) | |||
मालिकावीर | आयाबोंगा खाका (दक्षिण आफ्रिका) |
वेस्ट इंडीज राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी-फेब्रुवारी २०२२ दरम्यान चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. मूलत: दौऱ्यात एकूण पाच महिला वनडे आणि तीन महिला ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश होता. परंतु नंतर तीन ट्वेंटी२० आणि एक महिला वनडे सामने वेळापत्रकातून काढले गेले.
मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन व्हान नीकर्कला दुखापत झाल्याने ती या मालिकेतून आणि २०२२ महिला क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडली. उपकर्णधार लिझेल ली हिला कोव्हिड-१९ची लागण झाल्याने तीने देखील मालिकेत भाग घेतला नाही. त्यामुळे सुने लूसला कर्णधारपदाची सुत्रे देण्यात आली. सर्व महिला वनडे सामने जोहान्सबर्ग मधील वॉन्डरर्स स्टेडियमवर खेळविण्यात आले. पहिला सामना पावसामुळे अर्धातून रद्द करावा लागला. दुसऱ्या सामना बरोबरीत सुटला. सुपर ओव्हर मध्ये वेस्ट इंडीजने विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. अखेरचे दोन सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने मालिका २-१ ने जिंकली.
सराव सामने
५० षटकांचा सामना:दक्षिण आफ्रिका महिला XI वि वेस्ट इंडीज महिला XI
२५ जानेवारी २०२२ धावफलक |
वि | ||
शेमेन कॅम्पबेल ४२ (४८) नादिने डी क्लर्क ३/२७ (७ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला XI, फलंदाजी.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज २३४/३ (४५.३ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका ८७/५ (१७.४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे वेस्ट इंडीजचा डाव ४५.३ षटकांनंतर थांबला. दक्षिण आफ्रिकेच्या डावादरम्यान पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द केला गेला.
२रा सामना
दक्षिण आफ्रिका १६० (४०.४ षटके) | वि | वेस्ट इंडीज १६० (३७.४ षटके) |
डिआंड्रा डॉटिन ३७ (३१) आयाबोंगा खाका ५/२६ (८ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
४था सामना
वेस्ट इंडीज १७४ (४९.२ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १७५/४ (३९.५ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- मँडी मंगरु (वे.इं.) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.