वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२ | |||||
श्रीलंका | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २१ नोव्हेंबर – ३ डिसेंबर २०२१ | ||||
संघनायक | दिमुथ करुणारत्ने | क्रेग ब्रेथवेट | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | दिमुथ करुणारत्ने (२७८) | न्क्रुमा बॉनर (१४८) | |||
सर्वाधिक बळी | रमेश मेंडीस (१८) | जॉमेल वारीकन (९) | |||
मालिकावीर | रमेश मेंडीस (श्रीलंका) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. मूलत: हा दौरा नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ दरम्यान होणार होता परंतु तेव्हा दोन्ही संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ही मालिका एक वर्ष आधी खेळवण्यात आली. कसोटी मालिकेआधी वेस्ट इंडीजने एक चार-दिवसीय सराव सामना खेळला.
पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजसमोर चौथ्या दिवशी ३४८ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. चौथ्या दिवसअखेरीस वेस्ट इंडीजने ५२ धावा करत ६ गडी गमावले. पाचव्या दिवशी उपहारानंतर चिवट खेळ करत वेस्ट इंडीजने कसोटी अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना अपयश आले. पाचव्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रात वेस्ट इंडीजचा संघ १६० धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेने पहिली कसोटी १८७ धावांनी जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली. दुसरी कसोटी देखील १६४ धावांनी जिंकत श्रीलंकेने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.
सराव सामने
चार-दिवसीय सामना:श्रीलंका बोर्ड अध्यक्ष XI वि वेस्ट इंडीयन्स
१४-१७ नोव्हेंबर २०२१ धावफलक |
श्रीलंका बोर्ड अध्यक्ष XI | वि | |
- नाणेफेक: नाणेफेक नाही.
- पावसामुळे चारही दिवस खेळ झाला नाही.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
श्रीलंका | वि | वेस्ट इंडीज |
३८६ (१३३.५ षटके) दिमुथ करुणारत्ने १४७ (३००) रॉस्टन चेस ५/८३ (२८.५ षटके) | ||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- जेरेमी सोलोझानो (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
- शई होप याने दुखापतग्रस्त जेरेमी सोलोझानोच्या जागी पूर्णवेळ बदली खेळाडूम्हणून उर्वरीत सामना खेळला.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - १२, वेस्ट इंडीज - ०.
२री कसोटी
श्रीलंका | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- चरिथ असलंका (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : श्रीलंका - १२, वेस्ट इंडीज - ०.