वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३-९४
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३-९४ | |||||
श्रीलंका | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १ – १३ डिसेंबर १९९३ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | रिची रिचर्डसन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९९३ मध्ये एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. वेस्ट इंडीजचा हा पहिलाच श्रीलंका दौरा होता. दोन्ही देशांमध्ये पहिला वहिला कसोटी सामना खेळला गेला. एकमेव कसोटी सामना अनिर्णित सुटला तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१ डिसेंबर १९९३ (दि/रा) धावफलक |
वेस्ट इंडीज १९७/३ (३९ षटके) | वि | श्रीलंका ३५/२ (१२.१ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेच्या डावादरम्यान पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द केला गेला.
- वेस्ट इंडीजने श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
२रा सामना
१६ डिसेंबर १९९३ (दि/रा) धावफलक |
वेस्ट इंडीज २२९/८ (४९ षटके) | वि | श्रीलंका २३०/७ (४८.१ षटके) |
अर्जुन रणतुंगा ६६ (७८) अँडरसन कमिन्स ४/३३ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
३रा सामना
१८ डिसेंबर १९९३ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका १०३/५ (२३ षटके) | वि | वेस्ट इंडीज १०७/४ (२२.१ षटके) |
अरविंद डि सिल्व्हा ३४ (४९) कर्टनी वॉल्श ३/२४ (५ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २३ षटकांचा करण्यात आला.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
८-१३ डिसेंबर १९९३ धावफलक |
श्रीलंका | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या दोन देशांमधला पहिला कसोटी सामना.
- वेस्ट इंडीजने श्रीलंकेमध्ये पहिल्यांदाच कसोटी खेळली.
- दुलीप समरवीरा (श्री) याने सर्वांनी कसोटी पदार्पण केले.