वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९ | |||||
बांगलादेश | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | १८ नोव्हेंबर २०१८ – २२ डिसेंबर २०१८ | ||||
संघनायक | शाकिब अल हसन (कसोटी) मशरफे मोर्ताझा (ए.दि.) | क्रेग ब्रेथवेट (कसोटी) रोव्हमन पॉवेल (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | महमुद्दुला (१७०) | शिमरॉन हेटमायर (२२२) | |||
सर्वाधिक बळी | मेहेदी हसन (१५) | जॉमेल वारीकन (८) | |||
मालिकावीर | शाकिब अल हसन (बांगलादेश) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | तमिम इक्बाल (१४३) | शई होप (२९७) | |||
सर्वाधिक बळी | मेहेदी हसन (६) मशरफे मोर्ताझा (६) | ओशेन थॉमस (४) किमो पॉल (४) | |||
मालिकावीर | शई होप (वेस्ट इंडीज) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिटन दास (१०९) | शई होप (११४) | |||
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (८) | किमो पॉल (७) शेल्डन कॉट्रेल (७) | |||
मालिकावीर | शाकिब अल हसन (बांगलादेश) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघ १८ नोव्हेंबर २०१८ ते २२ डिसेंबर २०१८ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[१] डिसेंबर २०१२ नंतर पहिल्यांदाच वेस्ट इंडीज बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. जुलै २०१८ मध्ये सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले. सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पहिला वहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात येईल.
दौऱ्यापुर्वी, वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरला खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी क्रेग ब्रेथवेटला कर्णधार नेमण्यात आले.
सराव सामने
दोन-दिवसीय सामना : बीसीबी एकादश वि. वेस्ट इंडीज
लिस्ट-अ सामना : बीसीबी एकादश वि. वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज ३३१/८ (५० षटके) | वि | |
शई होप ८१ (८४) रूबेल होसेन २/५५ (१० षटके) | तमिम इक्बाल १०७ (७३) रॉस्टन चेझ २/५७ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२२-२६ नोव्हेंबर २०१८ धावफलक |
बांगलादेश | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- नयीम हसन (बां) याने कसोटी पदार्पण केले तर पदार्पणातच पाच बळी घेणारा बांग्लादेशचा ८वा तर सर्वात युवा गोलंदाज ठरला. (१७ वर्षे ३५६ दिवस)
- शाकिब अल हसन (बां) २०० कसोटी बळी घेणारा बांग्लादेशचा पहिलाच गोलंदाज ठरला.
- बांग्लादेशचा मायदेशातील वेस्ट इंडीजविरुद्ध पहिलाच कसोटी विजय.
२री कसोटी
३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर २०१८ धावफलक |
बांगलादेश | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- शदमन इस्लाम (बां) याने कसोटी पदार्पण केले.
- केमार रोचचा (विं) ५०वा कसोटी सामना.
- मुशफिकुर रहिम (बां) ४,००० कसोटी धावा पूर्ण करणारा बांग्लादेशचा दुसरा फलंदाज ठरला.
- बांग्लादेशने इतिहासात पहिल्यांदाच विरोधी संघावर फॉलो-ऑन लादला.
- मेहेदी हसनची (बां) बांग्लादेशतर्फे खेळताना कसोटीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी (१२/११७).
- बांग्लादेशचा धावांचा विचार करता सर्वात मोठा विजय, तर एक डाव राखून पहिलाच कसोटी विजय.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज १९५/९ (५० षटके) | वि | बांगलादेश १९६/५ (३५.१ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- रोव्हमन पॉवेलने (विं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.
- मशरफे मोर्ताझाचा (बां) २००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना (आशिया एकादशचे २ धरुन).
२रा सामना
बांगलादेश २५५/७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २५६/६ (४९.४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
३रा सामना
वेस्ट इंडीज १९८/९ (५० षटके) | वि | बांगलादेश २०२/२ (३८.३ षटके) |
तमिम इक्बाल ८१* (१०४) किमो पॉल २/३८ (७ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- या मैदानावरचा पहिलाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- मशरफे मोर्ताझा (बां) २०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळणारा बांग्लादेशचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
- मशरफे मोर्ताझाने (बां) सर्वाधीक वेळा बांग्लादेशचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात खेळण्याचा नवा विक्रम केला (७०).
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
बांगलादेश १२९ (१९ षटके) | वि | वेस्ट इंडीज १३०/२ (१०.५ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
२रा सामना
बांगलादेश २११/४ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १७५ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी.
- शाकिब अल हसनचे (बां) ट्वेंटी२०त प्रथमच पाच बळी.
३रा सामना
वेस्ट इंडीज १९० (१९.२ षटके) | वि | बांगलादेश १४० (१७ षटके) |
लिटन दास ४३ (२५) किमो पॉल ५/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी.
- शेरफेन रुदरफोर्ड (विं) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- किमो पॉलचे (बां) ट्वेंटी२०त प्रथमच पाच बळी.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).