वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१६-१७
वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०१६-१७ | |||||
पाकिस्तान | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २० सप्टेंबर – ३ नोव्हेंबर २०१६ | ||||
संघनायक | मिस्बाह-उल-हक (कसोटी) अझहर अली (ए.दि.) सरफराज अहमद (टी२०) | जेसन होल्डर (कसोटी व ए.दि.) कार्लोस ब्रेथवेट (टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अझहर अली (४७४) | क्रेग ब्रेथवेट (३२८) | |||
सर्वाधिक बळी | यासिर शाह (२१) | देवेंद्र बिशू (१८) | |||
मालिकावीर | यासिर शाह (पा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (३६०) | मार्लोन सॅम्यूएल्स (११६) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद नवाझ (७) | अल्झारी जोसेफ (४) जासन होल्डर (४) | |||
मालिकावीर | बाबर आझम (पा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (१०१) | ड्वेन ब्राव्हो (८४) | |||
सर्वाधिक बळी | इमाद वसिम (९) | केस्रिक विल्यम्स (२) सॅम्युएल बद्री (२) | |||
मालिकावीर | इमाद वसिम (पा) |
सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१६ दरम्यान वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. सदर दौऱ्यावर तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] कसोटी मालिकेमधील एक कसोटी सामना दिवस/रात्र खेळवण्यासाठी वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने तत्त्वतः मान्यता दिली होती.[१]
सुरुवातीला, वेळापत्रकानुसार २-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामने आयोजित करण्यात आले होते.[२] मे २०१६ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंकेच्या दौऱ्याबाबत शक्यता पडताळून पाहत होते.[३] परंतु श्रीलंकेत पावसाचा मोसम असल्याने सदर कल्पना बाद करण्यात आली.[१] मालिकेमध्ये, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, दुबई येथे होणाऱ्या एका दिवस/रात्र कसोटी सामन्याचा समावेश असल्याच्या वृत्ताला पीसीबी ने ऑगस्ट २०१६ मध्ये पुष्टी दिली.[४][५][६]
दुबई येथील पहिली कसोटी ही पाकिस्तानची ४००वी कसोटी आणि दुसरी दिवस-रात्र कसोटी.[७][८] दिवस/रात्र कसोटी सुरू होण्यापुर्वी दोन्ही कर्णधारांनी ह्या स्वरूपासाठी पाठिंबा दाखवला होता. पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह-उल-हक म्हणाला "ह्या क्षणी, कसोटी क्रिकेट पाहणाऱ्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेता हेच कसोटी क्रिकेटचे भविष्य आहे. ".[९] वेस्ट इंडीजचा कर्णधार जासन होल्डरला ही संकल्पना आवडली, तो म्हणाला की "आपण नवीन गोष्टीला संधी दिली पाहिजे".[१०] परंतू, कसोटीच्या पहिल्या दिवशी, मैदानावर फक्त ६८ चाहते होते आणि खेळ संपेपर्यंत हा आकडा फक्त ६०० पर्यंत वाढला होता.[११] कसोटी संपल्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी नमूद केले की "गुलाबी चेंडूवरती आणखी काम करणे गरजेचे आहे. अजूनतरी तो आवश्यक मापदंडापर्यंत नाहीये आणि मला वाटतं दिवस/रात्र कसोटीसाठी तो एकच अडथळा आहे."[१२]
पाकिस्तानने एकदिवसीय आणि टी२० मालिका ३-० ने जिंकल्या. कसोटी मालिका सुद्धा पाकिस्तानने २-१ ने जिंकली. शेवटच्या कसोटी वेस्ट इंडीजने विजय मिळवला. जासन होल्डरच्या नेतृत्वाखाली हा त्यांचा पहिलाच कसोटी विजय.[१३][१४] विजयानंतर, होल्डर म्हणाला "आम्ही लढाऊपणा दाखवला. विजयाचे श्रेय क्रेग ब्रेथवेटला दिले पाहिजे. तो पहिल्या डावात खूपच चांगला खेळला आणि दुसऱ्या डावात पाठलागाची जबाबदारी घेतली".[१५]
संघ
- वैयक्तिक कारणामुळे टी२० संघातून माघार घेतल्याने आंद्रे रसेलऐवजी केस्रिक विल्यम्सची निवड करण्यात आली.[२२]
- डेंग्यू तापामुळे पहिल्या कसोटीला मुकल्यानंतर २ऱ्या कसोटीसाठी युनिस खानचा संघात समावेश करण्यात आला.[२३]
दौरा सामने
टी२०: अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश वि. वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज १६६/७ (२० षटके) | वि | अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश १४४/६ (२० षटके) |
मोहम्मद कासीम ४६ (५४) सॅम्यूएल बद्री ३/२० (४ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी
- प्रत्यकी १६ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक)
दोन-दिवसीयः अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश वि. वेस्ट इंडीज
वेस्ट इंडीज | वि | अमिरात क्रिकेट बोर्ड एकादश |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- प्रत्येकी १५ खेळाडू (११ फलंदाज, ११ क्षेत्ररक्षक).
तीन-दिवसीयः पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रन वि वेस्ट इंडीज
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रन | वि | वेस्ट इंडीज |
२६/३ (१६ षटके) मोहम्म हफीज ९ (१८) क्रेग ब्रेथवेट २/३ (४ षटके) |
- नाणेफेक: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रन, फलंदाजी
टी२० मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज ११५ (१९.५ षटके) | वि | पाकिस्तान ११६/१ (१४.२ षटके) |
ड्वेन ब्राव्हो ५५ (५४) इमाद वसिम ५/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: निकोलस पूरन (पा)
- इमाद वसिम हा पाकिस्तानतर्फे आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५ गडी घेणारा पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज.[२४]
२रा सामना
पाकिस्तान १६०/४ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज १४४/९ (२० षटके) |
सुनिल नारायण ३० (१७) सोहेल तन्वीर ३/१३ (४ षटके) |
३रा सामना
वेस्ट इंडीज १०३/५ (२० षटके) | वि | पाकिस्तान १०८/२ (१५.१ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय टी २० पदार्पण: रुमान रईस (पा) आणि केस्रिक विल्यम्स (वे).
- तीन-सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाकिस्तानचा हा पहिलाच व्हाईट वॉश.[२७]
एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान २८४/९ (४९ षटके) | वि | वेस्ट इंडीज १७५ (३८.४ षटके) |
बाबर आझम १२० (१३१) कार्लोस ब्रेथवेट ३/५४ (१० षटके) | मार्लोन सॅम्युएल्स ४६ (५९) मोहम्मद नवाज ४/४२ (१० षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, गोलंदाजी
- पाकिस्तानच्या डावादरम्यान प्रकाशदिव्यांमध्ये झालेल्या बिघाडामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांपर्यंत कमी करण्यात आला, आणि वेस्ट इंडीजसमोर २८७ दावांचे लक्ष्य ठेवण्यात आले.
- एकदिवसीय पदार्पण: क्रेग ब्रेथवेट (वे)
- बाबर आझमचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.
२रा सामना
पाकिस्तान ३३७/५ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २७८/७ (५० षटके) |
बाबर आझम १२३ (१२६) जासन होल्डर २/५१ (८ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- एकदिवसीय पदार्पण: अल्झारी जोसेफ (वे)
३रा सामना
पाकिस्तान ३०८/६ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज १७२ (४४ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: एव्हिन लुईस (वे).
- पाकिस्तानतर्फे लागोपाठ तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक करणारा बाबर आझम हा तिसरा फलंदाज[२८]
- बाबर आझम (पा) हा तीन-सामन्यांच्या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला (३६०).[२९]
- अझर अली हा तीन एकदिवसीय शतके करणारा पहिलाच पाकिस्तानी कर्णधार[३०]
- वहाब रियाझचे (पा) १०० एकदिवसीय बळी पूर्ण.[२९]
कसोटी मालिका
१ली कसोटी
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: बाबर आझम आणि मोहम्मद नवाझ (पा)
- पाकिस्तानचा ४०० वा कसोटी सामना.[७]
- अझहर अली (पा) हा दिवस/रात्र कसोटी मध्ये शतक, द्विशतक आणि त्रिशतक करणारा पहिला फलंदाज. त्याच्या ४,००० कसोटी धावा पूर्ण.[३१][३२]
- यासिर शाह (पा) हा कसोटी क्रिकेट मध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू.[३३]
- देवेंद्र बिशूची वेस्ट इंडियन गोलंदाजातर्फे परदेशातील सर्वोत्कृष्ट तसेच संयुक्त अरब अमिरातीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३४]
- देवेंद्र बिशूची परदेशातील गोलंदाजातर्फे आशियातील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[३५]
२री कसोटी
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
२२७/२घो (६७ षटके) अझर अली ७९ (१३७) मिग्वेल कमिन्स १/२६ (७ षटके) |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- शॅनन गॅब्रिएलचे (वे) कसोटी क्रिकेट मध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[३६]
- युनिस खान आणि मिस्बाह-उल-हकच्या १ल्या गड्यासाठीच्या १७५ धावांच्या भागीदारीमुळे कसोटी क्रिकेटमधील ती एक सर्वात यश्वसी जोडी ठरली.[३७]
- राहत अलीचे (पा) ५० कसोटी बळी पूर्ण.[३८]
- यासिर शाहचे (पा) कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा १० बळी.[३९]
- मिस्बाहचा कर्णधार म्हणून १०वा मालिका विजय हा आशियाई कर्णधारातर्फे एक विक्रम.[४०]
३री कसोटी
पाकिस्तान | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- मिस्बाह-उल-हकने सर्वात जास्त कसोट्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले (४९).[४१]
- क्रेग ब्रेथवेट हा कसोटीमधील पूर्ण झालेल्या डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहणारा वेस्ट इंडीजचा पाचवा फलंदाज.[४२]
- जासन होल्डरचे (वे) कसोटीमध्ये पहिल्यांदाच डावात पाच बळी.[४३]
- जासन होल्डरचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी विजय.[१३]
- कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात नाबाद राहणारा क्रेग ब्रेथवेट हा पहिलाच सलामीवीर ठरला.[४४]
- वेस्ट इंडीजचा पाकिस्तान विरुद्ध परदेशातील १९९० नंतरचा पहिलाच कसोटी विजय.[४४]
संदर्भ आणि नोंदी
- ^ a b c "वेस्ट इंडीज, पाकिस्तान युएई मधील दिवस-रात्र कसोटीसाठी तयार" (इंग्रजी भाषेत). १९ जून २०१६ रोजी पाहिले.
- ^ "भविष्यातील दौरे" (PDF) (इंग्रजी भाषेत). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज मालिकेसाठी श्रीलंकेच्या मैदानांचा विचार" (इंग्रजी भाषेत). १६ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानची पहिला दिवस-रात्र कसोटी ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजच्या पाकिस्तान दौर्याची योजना घोषित" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज दरम्यान दुबईमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना" (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "चौसष्ट वर्षे, ४०० कसोटी, अनेक यशोशिखरे" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानची फलंदाजी; आझम, नवाझचे पदार्पण" (इंग्रजी भाषेत). १३ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "डे-नाईट टेस्टस् 'लुक्स लाईक द फ्युचर' - मिस्बाह". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दिवस-रात्र कसोटीला संधी द्या - होल्डर". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "दुसर्या दिवस-रात्र कसोटीच्या सुरवातीला हजारो रिकाम्या खुर्च्या". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान वि वेस्ट इंडीज: डॅरेन ब्राव्होच्या शतकाने यजमानांचा विजय जवळजवळ अशक्य केला". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "ब्रेथवेटच्या खेळीने वेस्ट इंडीजचा विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "कसोटीत २६ वर्षांनंतर विंडीजने पाकला हरवलं". महाराष्ट्र टाइम्स. 2016-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "'माय बेस्ट एफर्ट, बट डोन्ट वाँट टू गेट कॅरिड अवे' - क्रेग ब्रेथवेट". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान कसोटी संघात बाबर आझम, नवाझची निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "युएई कसोटीसाठी वेस्ट इंडीज संघात फिरकी गोलंदाज वॉरिकॅन". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आफ्रिदीच्या निरोपाच्या मालिकेची हालचाल बासनात". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी उमर अकमल, असद शफिकचे पाकिस्तानी संघात पुनरागमन". इएसपीन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "एकदिवसीय संघात क्रेग ब्रेथवेटचा समावेश, रोव्हमन पॉवेल, पूरनला बोलावले" (इंग्रजी भाषेत). ५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानच्या टी२० संघात अकमलचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वेस्ट इंडीज टी२० संघात रसेल ऐवजी विल्यम्स". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "युनिस खानची दुसर्या कसोटीसाठी पाकिस्तानी संघात निवड". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इमाद वसीमच्या १४ धावांतील ५ बळींमुळे वेस्ट इंडीजची वातहत". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १,५०० धावा करणारा [[शोएब मलिक]] हा तिसरा पाकिस्तानी फलंदाज". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "पाकिस्तानच्या वेस्ट इंडीजवरील टी२० मालिका विजयात सोहेल तन्वीर, हसन अली चमकले". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इमादच्या तीन बळींमुळे पाकिस्तानचा ३-० ने सहज मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "लागोपाठच्या डावांमध्ये शतके". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ a b "बाबर आझम इन एलिट कंपनी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानी कर्णधारांची शतके". इएसपीएन क्रिकइन्फो. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अझहरचे शतक - पाकिस्तानच्या ४०० व्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा मथळा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अझहरच्या नाबाद ३०२ धावांनंतर पाकिस्तानचा डाव ५७९ धावांवर घोषित". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "यासिरचा १००वा बळी, वेस्ट इंडीज सर्वबाद ३५७". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बिशूच्या ८ बळींनी पाकिस्तानचा १२३ धावांत खुर्दा". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बिशूचे आठ बळी ही परदेशी गोलंदाजाची आशियातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १८ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "उशीरा मिळालेल्या दोन बळींमुळे पाकिस्तान वरचढ". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानची सर्वात यशस्वी जोडी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "वूब्ली विंडीज विल्ट". त्रिनिदाद अँड टोबॅगो गार्डियन (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "यासिरच्या सहा बळींमुळे पाकिस्तानचा मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "यासिरचे १० बळी, मिस्बाहचे १० मालिका विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "मिस्बाह: पाकिस्तानचा सर्वात जास्त यशस्वी कर्णधार". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ब्रेथवेट शेवटपर्यंत नाबाद राहिल्याने वेस्ट इंडीजला दुर्मिळ आघाडी". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ "होल्डरच्या पाच बळींमुळे वेस्ट इंडीजला विजयासाठी १५३ धावांची गरज". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.}
- ^ a b "क्रेग ब्रेथवेटने केला नवा कसोटी विक्रम". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ३ नोव्हेंबर २०१६ रोजी पाहिले.